कन्हान शहरात जुन्या वादातून भरदिवसा युवकाची हत्या एक जख्मी, तीन आरोपी अटक

कन्हान शहरात जुन्या वादातून भरदिवसा युवकाची हत्या
एक जख्मी, तीन आरोपी अटक

कन्हान, ता. २० जूलै
पोलीस स्टेशन हद्दीतील सत्रापुर येथे, शितला माता मंदिरा जवळ जुन्या वादातुन एका युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली असुन नागरिकात चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

        मृतक – जयराज गायकवाडचा फोटो.

        प्राप्त माहिती नुसार, आज गुरूवार (दि.२०) जुलै २०२३ ला दुपार च्या दरम्यान सत्रापुर येथिल शितला माता मंदिराजवळ मृतक जयराज भीमराव गायकवाड (वय ३७) आणि जख्मी युवराज भीमराव गायकवाड (वय ३५) रा. सत्रापुर हे दोघेही सख्खे भाऊ असुन यांचा आरोपी भेंडंग पुरवले, देवेंद्र भेडंग पुरवले, साहिल भेडंग पुरवले यांचा जुन्या वादातुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला कि, आरोपींनी जयराज गायकवाड व युवराज गायकवाड यांचावर चाकुने आणि ब्लेड ने सपासप मारुन गंभीर जख्मी केले. घटनेनंतर नातेवाईकांनी जयराज गायकवाड व युवराज गायकवाड यांना उपचाराकरिता खाजगी रुग्णालय कामठी दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान जयराज गायकवाड याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच सहायक फौजदार गणेश पाल, मुदस्सर जमाल, सचिन वेळेकर सह पोलीस कर्मचारी यांनी कामठी रुग्णालयात येथे पोहचुन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदना करिता कामठी ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

 

   पोलीस अधिक्षक विशाल आनंद घटनास्थळी

     घटनेनंतर कन्हान पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांनी सहायक पोलीस निरिक्षक सी.पी चव्हाण, पराग फुलझले, राजेश जोशी, हरिष सोनभद्रे सह पोलीस कर्मचा-यांना परिसरात पेट्रोलिंग करण्या करिता रवाना केले. पोलीसांनी ताबड़तोड़ तीन्ही आरोपी भेंडंग पुरवले, देवेंद्र भेडंग पुरवले, साहिल भेडंग पुरवले ला पकडण्यात यश आले. सदर घटना गांभीर्याने घेत नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट देऊन शहरात शांती सुव्यवस्था कायम राहावी म्हणुन घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दखने शाळेत पाठ्यपुस्तक वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न 

Fri Jul 21 , 2023
दखने शाळेत पाठ्यपुस्तक वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न कन्हान, ता.२१ जूलै    अखिल भारतीय पुलक मंच परिवार आणि राष्ट्रीय जैन महिला जागृति मंच शाखा महाल, नागपुर यांचा संयुक्त विद्यमाने बळीरामजी दखने हायस्कुल, कन्हान येथे विद्यार्थांना पाठ्यपुस्तक वितरण करून परिसरीत वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.        मंगळवार (दि.१८) जुलै […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta