200 kg मासे किंमत 20000, रुपयाचा माल चोरी,एकुण 47,700. रुपयाचा मुद्देमाल हस्तगत,तिन आरोपी अटक

*मौजा गुंढरी येथुन शिलांग जातीचे एकुण 400 नग असा 200 kg मासे किंमत 20000 रुपयाचा माल चोरी,एकुण 47,700. रुपयाचा मुद्देमाल हस्तगत,तिन आरोपी अटक*

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रीतानिधी

*पारशिवनी*(ता प्र) – पारशिवनी पोलीस स्टेशन अतंर्गत मौजा गुंडरी येथुन शिलांग जातीचे प्रत्येकी 500gm वजनीचे एकुण 400 नग असा एकुण 200 kg मासे किंमत 20000 रुपयाचा माल चोरी गेल्याने पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी पुढील तपास घेत तीन ही आरोपीला अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार दिनांक 15 फेब्रुवारी 2021 ते 08 मार्च 2021 चे सायंकाळी 05 वाजता मौजा गुंडरी येथुन फिर्यादी सुखसागर बंडु मेश्राम वय 35 वर्ष राहणार न्यु गोंडेगाव जे.एन.हाॅस्पीटल जवळ कांन्द्री यांचा मासेपालन च्या टाक्यातुन शिलांग जातीचे प्रत्येकी 500gm चे 400 नग असा एकुण 200 kg मासे किंमत 20000 रुपयांचा माल कोणीतरी अज्ञात चोरोंनी चोरुन नेल्याचे तोंडी रिपोर्ट वरुन सदर चा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला . सदर गुन्ह्याचा तपासात नमुद आरोपींना दिनांक 09 मार्च 2021 रोजी अटक करुन मा . न्यायालयात पेश करुन दिनांक 11 मार्च 2021 पर्यंत पी.सी.आर घेण्यात आला असुन पी.सी.आर दरम्यान नमुद आरोपी कडुन त्यांनी गुन्ह्यात चोरी केलेले मासे नागपुर येथील राहणारे मासे व्यवसाई सुभाष गौर यांना 20000 रुपयात विकल्याचे सांगितल्याने आरोपी क्रमांक 1) उमेश बापुराव केळवदे याचा कडुन त्याचा हिस्स्याचे 10000 रुपया पैकी 9000 रुपए , त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल क्रमांक एम एच 40 एई 2016 किंमत 30000 रुपए , मासे पकडण्यासाठी वापरलेले नायलाॅनचे जाळ किंमत 200 रुपए असा साहित्य हस्तगत करण्यात आले . त्याच प्रमाणे आरोपी क्रमांक 2) शेषराव सुखदेव मारबते ह्यांचा कडुन मासे विकुण त्यांचा हिस्स्यामध्ये आलेले 5000 रुपए पैकी 4500 रुपए आरोपी क्रमांक 3) विष्णु उर्फ नंदकिशोर तान्हाजी वाघधरे ह्यांचा कडुन मासे विकुण त्यांचा
हिस्स्यामध्ये आलेले 5000 रुपए पैकी 4000 रुपए असा एकुण 17,500 रुपए नगद एक मोटार सायकल व नायलाॅन जाळ असा एकुण 47,700 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन पारशिवनी पोलीसांनी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 47/2021 कलम 379,34 भादवि तहत गुन्हा दाखल करुन पारशिवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांचा मार्गदर्शनात पो.ना संदीप कडु या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात २२ रूग्ण आढळुन वराडा ला कोरोना चा उद्रेक  

Sat Mar 13 , 2021
कन्हान परिसरात २२ रूग्ण आढळुन वराडा ला कोरोना चा उद्रेक #) वराडा येथे १६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक. #) कन्हान १ व ़टेकाडी १ अश्या दोघाचा मुत्यु.  # ) कन्हान ४, कांद्री २, वराडा १६ असे २२ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ११३१ रूग्ण.   कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta