१०० लिटर मोहाफुलाची दारू सह एकुण २०हजार,९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त : कन्हान पोलीसांची कारवाई

  • *कन्हान पोलीसांनी मोहाफुल ची दारु पकडली आरोपी जवळुन १०० लिटर मोहाफुलाची दारू सह एकुण २०हजार,९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त* .

कन्हान (ता प्र):– कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर गावात मोहाफुलाचीअवैध दारु विक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने कन्हान पोलीसांनी मोहाफुला च्या दारु भट्टी वर धाड मारुन व आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा जवळुन मोहाफुलाची दारु १०० लीटर , सह , एक ड्रम , चाबी , पाईप , घमेला , असा एकुण २०,९६० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन फिर्यादी कन्हान पोलीस स्टेशन चे हेडकाॅंस्टेबल अरुण सहारे यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
कन्हान पोलीसांन कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक १८ एप्रिल २०२१ ला दुपारी जवळपास २ वाजता च्या सुमारास कन्हान पोलीसांना सत्रापुर गावात मोहाफुलाची दारु विक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने कन्हान पोलीसांनी सत्रापुर येथे मोहाफुला च्या दारु भट्टी वर धाड मारुन व आरोपी प्रकाश बंडु पात्रे ,वय ३२ वर्ष ,राहणार सत्रापुर कन्हान याला ताब्यात घेऊन त्याचा जवळुन १) एक लोखंडी ड्रम किंमत ४०० रुपए , २) एक प्लास्टीक ची चाबी किंमत ५० रुपए , ३) एक प्लास्टिक चा पाईप किंमत १० रुपए ४) एक जर्मनचा घमेला किंमत ५०० रुपए ५) मोहाफुल ची दारु १०० लीटर किंमत प्रति लीटर २०० रुपए प्रमाणे २०,००० रुपए असा एकुण २०,९६० रुपयाचा मुद्देमाल आरोपी प्रकाश बंडु पात्रे याचा जवळ मिळुन आल्याने जप्त माला पैकी एका काचेचा चपट्या बाॅटल मध्ये १८० एम.एल मोहफुल दारु सील बंद करुन उर्वरीत माल मोक्यावर नाश करण्यात आला व आरोपी प्रकाश बंडु पात्रे याला कन्हान पोलीस स्टेशन येथे आनुन फिर्यादी कन्हान पोलीस स्टेशन चे हेडकाॅंस्टेबल अरुण सहारे यांचा तक्रारी वरुन आरोपी प्रकाश बंडु पात्रे याचा विरुद्ध कलम ६५ (ई.)(एफ.)(सी) तहत गुन्हा दाखल करुन सदर आरोपी प्रकाश बंडु पात्रे यास सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र मा.न्यायालयात सादर करते वेळी हजर राहण्याबाबतचे लेखी सुचना पत्र देऊन सोडण्यात आले .
सदर कारवाई परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचा मार्गदर्शनात हेड काॅंस्टेबल अरुण सहारे , मंगेश सोनटक्के , बंटी गेडाम , मुकेश वाघाडे , स्मीता पाल सह आदि पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई यशस्वी रित्याने पार पाडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पोलीस स्टेशन पारशिवणी येथे पायदळ रुंटमार्च काढण्यात आले.भाजीपाल्याची दुकाने शुक्रवार पासून तकिया मारोती मंदिर समोर लावण्यात यावे* .

Mon Apr 19 , 2021
*पोलीस स्टेशन पारशिवणी येथे पायदळ रुंटमार्च काढण्यात आले.भाजीपाल्याची दुकाने शुक्रवार पासून तकिया मारोती मंदिर समोर लावण्यात यावे* . कमलसिंह यादव पारशिवनी तालुक प्रातिनिधी *पारशिवनी* (ता प्र ):-पारशिवनी तालुक्यात व शहरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन सुद्धा नागरिकांन द्वारे शासनाच्या नियमाचे काठेकोरपणे पालन न होत असल्यामुळे पारशिवनी पोलींसा द्वारे पोलीस […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta