कन्हान मुख्य रस्त्यावरील ३,३०,३६४ रूपये होर्डिंग चोरी

कन्हान मुख्य रस्त्यावरील ३,३०,३६४ रूपये होर्डिंग चोरी

कन्हान,ता.06 ऑगस्ट

 पोलीस स्टेशन हददीत मुख्य रस्ता तारसा चौक, कन्हान येथील महाकाली कॉम्पलेक्सच्या वरचा बाजुला १५/२० फुट असे दोन जाहीरात फलक ( होर्डिंग ) लावण्यात आले होते. होर्डिंग करिता वापरण्यात आलेले लोंखडी एंगल, चँनल, नट बोल्ट असा एकुण ३,३०,३६४ रूपये चा मुद्देमाल चोरून नेल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तारसा चौक, कन्हान येथील  महाकाली कॉम्पलेक्सच्या वरचा बाजुला १५/२०  दोन जाहीरात फलक ( होर्डिंग ) लावण्यात आले होते. त्यात वापरण्यात आलेले लोंखडी १) सी चॅनल हेवी वेट १३८ किलो प्रत्येकी वजनाचे १२ नग प्रती किलो ५३.५० रू. प्रमाने किंमत ७२०३६ रू, २) ५५/५ एंगल २० फुट लांब ११८ किलो वजना चे १८ नग प्रती किलो ४२.५० किंमत १४०४८० रू. ३) ४५/५ एंगल २० फुट ९८ किलो वजनाचे २२ नग प्रती किलो ५३ रु. किंमत ९२,७०८ रू. ४) ६५/५ एंग ल २० फुट १२८ किलो वजनाचे १४ नग प्रती किलो ५२.५० रू. किंमत ७६,१६० रु. ५) डबल वार ३ मीट बोल्ट ३० किलो वजनाचे किमती ३२ रू. प्रमाणे किमंत ९६० रू. ६) जी बलेम १२ किलो वजनाचे किमत ९० रू. प्रमाणे किंमत १०८० रू. असा वरील सर्व मालाची एकुण किंमत ३,८३,३६४ रू. ऐवढी होती. त्यापैकी १० एंगल वाचले किंमत ५३,००० रू. चा माल वाचला व ३,३०,३६४ रूपये चा मुद्देमाल (ता.३) ऑगस्ट चे रात्री ११ वाजता ते (ता.४) चे सकाळी ९ वाजता दरम्यान अज्ञात आरोपीने चोरून नेल्याने सदर फिर्यादी यांच्या तक्रारीने पो.स्टे. कन्हान येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला असुन कन्हान पोस्टे चे पोहवा खुशाल रामटेके हे पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आज रामटेक ला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि शाहिर

Sun Aug 7 , 2022
  आज रामटेक ला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि शाहिर मेळावा कन्हान,ता.06 ऑगस्ट    महाराष्ट्र शाहीर परिषद रामटेक व भारतीय कलाकार शाहीर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोककलावंत, कलाकारांचा शाहीर मेळावा संत रोहीदास सभागृह मंगळवारी वार्ड रामटेक येथे रविवार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta