कांद्री आंगणवाडी सेविका सौ कुसुमताई  किरपान सेवानिवृत्तीपर समारंभासह निरोप 

कांद्री आंगणवाडी सेविका सौ कुसुमताई  किरपान सेवानिवृत्तीपर समारंभासह निरोप 


कन्हान : – कांद्री येथील आंगणवाडी क्र १५८ येथील सेविका कुसुमताई कृष्णराव किरपान या सेवानिवृत्त झाल्याने कांद्रीच्या सर्व आंगणवाडी सेविका व मदतनि स यांनी मिळुन त्यांना समारंभासह निरोप दिला.  

       कांद्री येथील आंगणवाडी क्र १५८ येथे कांद्री च्या सर्व आंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी निरोप समारंभाचे आयोजन करून आंगणवाडी सेविका कुसुमताई कृष्णराव किरपान (माजी सरपंचा) हयाना पुष्पगुच्छ, शाॅल, श्रीफल व विशेष उपहार देऊन सर्व आंगनवाडी सेविका व मदतनिस यांनी शब्द सुमनाने निरोप दिला. याप्रसंगी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र पर्यवेक्षिका सौ माधुरी राऊत, श्री मोर्याजी, वयोवृद्ध ग.भा सुशिलाबाई दिनानाथ नासरे, ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष श्री मोतीराम रहाटे, सामाजिक कार्यकर्ता वामन देशमुख आदी मान्यवरांनी कुसुमताई किरपान हयाना पुष्पगुच्छाने स्वागत करून त्याच्या कार्याचे  कौतुक करित पुढील आयुष्य सुखी, समृद्ध व निरोगी च्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविका मिना पडोळे यांनी तर आभार मनिषा वासनिक यांनी व्यकत केले. तदनंतर सर्वांना भोजन देऊन समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वि तेकरिता आयोजक मनिषा वासनिक, चंन्द्रप्रभा नासरे, शशीकला बागडे,  मंगला कामडे, मिना पडोळे, शोभा सरोदे, प्रभा चाफले, सरोज पानतावने, सुनिता मारबते, सत्यफुला आष्टणकर, नलु गिऱ्हे, प्रभा डोरले, सुमित्रा वैद्य, प्रतिक्षा सुखदेवे, छाया मस्के, रेखा मस्के, पौर्णिमा , रिना सुखदेवे आदिनी सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

   आज टेकाडी येथे भव्य रक्तदान शिबीर

Sat Sep 11 , 2021
आज टेकाडी येथे भव्य रक्तदान शिबीर कन्हान : – समाज सुधारक माहात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था व राजे शिव हेल्थ क्लब टेकाडी च्या वर्धापन दिनी संस्थे व्दारे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.         शनिवार (दि.११) सप्टेंबर २०२१ ला सकाळी ९ ते १ वाजे पर्यंत राजे शिव हेल्थ […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta