कोळश्याची अफरातफरी करणा-या ट्रक चालकास पकडुन मालकांचा शोध सुरू  

कोळश्याची अफरातफरी करणा-या ट्रक चालकास पकडुन मालकांचा शोध सुरू

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत अण्णा मोड एन एच ४४ हायवे रोड डुमरी शिवारात टिपर ट्रक चालक व मालक या दोघानी संगमत करून निम्न दर्जाचा कोळसा भरून ७५ हजार रूपयाच्या कोळश्याची अफरातफर केल्याने कन्हान पोलीसांनी ट्रक चालका स पकडुन दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रक मालकांचा चा शोध घेत आहे.

        प्राप्त माहिती नुसार (दि.१७) जुलै २०२१ ला सायंकाळी ५:३० ते रात्री १० वाजता दरम्यान टिपर ट्रक क्र. एम एच ४० बीएल ३४१९ चा मालक याने खदान नंबर ६ इंदर काॅलरी येथुन ३१,८०० टन कोळ सा किंमत ७५,००० रुपयाचा माल आपल्या टिप्पर ट्रक मध्ये भरून महामिनिरल्स माइनिंग अँन्ड बेनीफी सीएशन प्राइवेट लिमिटेड कोल वाॅशरी (गुप्ता कोल वाॅशरी) येसंबा येथे कोळसा खाली करण्याकरिता निघाला असता खदान नंबर ६ ते यसंबा हे अंतर अंदा जे ६ किलो मीटर असुन कोळसा भरलेला टिप्पर महा मिनिरल्स माइनिंग अँन्ड बेनीफीसीएशन प्राइवेट लिमि टेड कोल वाॅशरी (गुप्ता कोल वाॅशरी) येसंबा येथे खा ली न करता इतर ठिकाणी कोळसा खाली करून त्या ऐवजी निम्न दर्जाचा कोळसा भरून ७५,००० रुपये किंमतीच्या कोळश्याची अफरातफरी करून रात्री १० वाजता अण्णा मोड डुमरी येथे टिप्पर ट्रक सोडुन पळु न गेले. असे १) सुरेंन्द्र सिताराम पाटील वय ४५ वर्ष राह. कांन्द्री, धंदा सुपरवाइझर लोढा ट्रान्सपोर्ट व २) आनंद रमेश गुप्ता राह. सावनेर धंदा लिगल कन्सलटंट यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथे माहीती दिल्याने कन्हान पोलीसानी कोळसाच्या प्ररिक्षण अहवाल प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते यांनी चौकशी अहवाल तयार करून टिप्पर क्र. एमएच बी एल ३४१९ चा चालक रवि धुर्वे व मालक राहुल बातुलवार यांनी संगमत करून निम्न दर्जाचा कोळसा भरून ७५ हजार रुपयाच्या मालाची अफरातफर केल्याने सरकार तर्फे फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते यांच्या तक्रारी वरून टिपर ट्रक चालक रवीकरण काशीराम धुर्वे वय २६ वर्ष राह. खदान नंबर ६ कन्हान यास अटक करून त्यांचे विरुद्ध अप क्र २२१/२०२१ कलम ४०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून टिपर ट्रक मालक चा शोध सुरु केला आहे.

सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोउपनि सुनिल अंबरते, सफौ येशु जोसेफ, राहुल रंगारी, संजु भदोरि या हयानी करून पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

टेकाडी शेतशिवारात विज पडुन तीन बक-याचा मुत्यु व्यकटराव संतापे जख्मी

Sun Jul 18 , 2021
टेकाडी शेतशिवारात विज पडुन तीन बक-याचा मुत्यु व्यकटराव संतापे जख्मी. कन्हान : –  परिसरात दुपार नंतर आलेल्या वादळ वारा पाऊसा येऊन टेकाडी शेत शिवारात विज पडुन निंबा च्या झाडाखाली आढोश्याला असलेल्या तीन बक-या घटनास्थळी मुत्यु पावल्या तर त्यांना चाराई करणारा व्यरंटराव संतापे गंभीर जख्मी झाल्याने नागपुर ला शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta