कोल वॉशरीत महाजनको च्या वॉशिंग कोळश्यात मध्यप्रदेशातील वेस्ट कोल मिलावट करण्या-यावर कारवाई करा – प्रशांत पवार
भेसळ कोळश्यामुळे राज्याला जास्त दराने विद्युत पुरवठा
कन्हान,ता.२८ डिसेंबर (सुनिल सरोदे)
मौजा एंसबा (वराडा) स्थित महा मिनरल माइनिंग एंड बेनिफिशिएशन प्रा.लि. च्या कोल वॉशरी मध्ये मध्यप्रदेशातील गाडरवारा च्या पॉवर प्लांट च्या रिजेक्ट कोळसा महाजनको च्या वॉशिंग कोळश्यात रिजेक्ट (वेस्ट) कोल मिलावट करण्यास आणणा-या सहभागी व संबधित सर्वावर सरकारी कोळश्याची चोरी आणि सरकारी चांगल्या कोळश्यात भेसळ आदी गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. तत्काल प्रभावाने ही कोल वॉशरी बंद करून परिसरातील शेतकरी व गावक-यांना न्याय देण्यात यावा. अशी मागणी जय जवान जय किसान संघटना अध्यक्ष मा. प्रशांत पवार यांनी कन्हान ठाणेदार विलास काळे यांना पुरव्यासह लेखी तक्रार देऊन केली आहे. पारशिवणी तालुक्यातील गोंड़ेगाव कोळसा खुली खदान जवळ मौजा एंसबा स्थित महा मिनरल माइनिंग एंड बेनिफिशिएशन प्रा.लि. च्या (गुप्ता) कोल वॉशरी मध्ये (दि.२४) डिसेंबर २०२२ शनिवारी सकाळी ९ वाजता पासुन ७ पेक्षा जास्त ट्रक मध्ये मध्यप्रदेशातील गाडरवारा च्या पॉवर प्लांट रिजेक्ट (वेस्ट) कोळसा आणण्यात आला. हा रिजेक्ट कोळशा महाजनको च्या सरकारी कोळश्यात मिश्रीत करण्यास उपयोग केला जात आहे. यामुळेच चांगल्या कोळश्यात हा रिजेक्ट कोळसा मिश्रीत करताना मोठया प्रमाणात कोळसा धुळीचे प्रदुषण होत आहे. महाजनको च्या चांगल्या कोळश्यात रिजेक्ट कोळसा मीश्रीत करून खापरखेड़ा, कोराडी पॉवर प्लांट ला पाठविला जातो. या मिलावटी कोळश्यामुळे आम्हच्या राज्याला जास्त दराने विदयुत पुरवठा करावा लागत आहे. याच मुळे पॉवर प्लांट चे लोड फैक्टर ही कमी होत आहे.
हिंद महा मिनरल एलएलपी कंपनी ला महाजन को ला कोल वॉश (धुलाई) करण्याचा टेंडर मिळाला आहे. या कंपनी च्या अंतर्गत महा मिनरल माइनिंग एण्ड बेनिफिशिएशन प्रा.लि.ची गोंड़ेगाव कोळसा खुली खदान जवळील मौजा एंसबा स्थित कोल वॉशरी कोळसा वॉशिंग (धुलाई) चे काम करित आहे. हिंद महा मिनरल एलएलपी च्या जवळ महाजनको ला पाठविणा-या कोळश्यात १ लाख ४५ हज़ार टन कोळसाची कमतरता आहे. कारण की, या कंपनी ने लाखों टन चांगला कोळसा खुल्या बाजारात १२,००० रुपये प्रति टन प्रमाणे विकला आहे. या कमी कोळश्याची पुर्तता करण्याकरिता हिंद महा मिनरल एलएलपी द्वारे विविध स्थाना वरून रिजेक्ट कोळशा तथा वेस्ट मटेरियल आणण्यात येत आहे. ज्यात मध्यप्रदेश पॉवर प्लांट, छत्तीसगढ़, रायपुर च्या आयरन कंपनिया, नागपुर च्या खापरखेड़ा, कोराडी पॉवर प्लांट, चंद्रपुर च्या सीटीपीएस पॉवर प्लांट, वणीची गोपनी आयरन, वर्धा येथील उत्तम गलवा, लॉयट्स, घुग्घसची लॉयट्स आदी कंपनी चा समावेश आहे. या जागी येणारा रिजेक्ट कोल व वेस्ट मटेरियलची मिलावटखोरी महाजनको च्या चांगल्या कोळश्यात करण्यात येत आहे. याचे ताजे उदाहरण गोंडेगांव कोळसा खुली खदान जवळ मौजा एंंसबा येथील कोल वॉशरी मध्ये मिळाले आहे.
शनिवार (दि.२४) डिसेंबर ला सकाळी ९ वाजे पासुन मध्यप्रदेशातील गाडरवाड़ा पॉवर प्लांट येथील रिजेक्ट कोळसा भरून ट्रक क्र. एम एच ४० सीडी ९९८६ व एम एच ४० सी डी ४७७०, एम एच ४० बी जी ५१९३ महा मिनरल माइनिंग एंड बेनिफिशिएशन प्रा. लि. च्या एंसबा स्थित कोल वॉशरी मध्ये आणण्या त आला. यांचे दस्तावेज पुरावे आमच्या कडे आहे. हा रिजेक्ट कोळसा चांगल्या कोळश्यात मिलावट करण्यासाठी नाही तर दुस-या कोणत्या काम करिता आणला आहे ? या वॉशरी मध्ये मध्यप्रदेशातुन आणलेला रिजेक्ट कोळसा हिंद महा मिनरल एलएलपी च्या कोल वॉशरीत मिलावट करिता आणलेल्या रिजेक्ट कोळश्याच्या काळेबाजारात सर्व सहभागी आहे. ज्यात मध्यप्रदेशातील गाडरवाड़ा स्थित पॉवर प्लांट चे अधि कारी, ट्रांसपोर्ट, ट्रक चालक व मालक, महा मिनरल माइनिंग एंड बेनिफिशिएशन प्रा. लि. च्या मौजा एंसबा येथील कोल वॉशरी चे चालक आणि मालिक सहभा गी आहेत. या सर्वावर सरकारी कोळश्याची चोरी आणि सरकारी चांगल्या कोळश्यात मिलावट आदी गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. तसेच तत्काल प्रभावाने ही कोल वॉशरी बंद करून परिसरातील शेतकरी व गावक-यांना कोळसा धुळीच्या प्रदुषणा पासुन मुक्त करून न्याय देण्यात यावा. अशी मागणी जय जवान जय किसान संघटना अध्यक्ष मा. प्रशांत पवार यांनी कन्हान ठाणेदार विलास काळे यांना पुरव्यासह लेखी तक्रार देऊन केली आहे.
(सोबत – ट्रक च्या डी ओ ची झेराक्स प्रत, वजन काटा प्रत, वॉशरी मध्ये मध्यप्रदेशातुन आणलेल्या रिजेक्ट कोळसा भरलेले जाताना ट्रक )

