हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीची जागेची मागणी करणारे नेते गहाळ
राज्य सरकार गोर-गरीबांचे कां ? उद्योगपतींचे, चर्चेला उधाण
लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे कन्हान शहराचे भविष्य अंधारात

कन्हान,ता.२१ जानेवारी
नागपुर हिवाळी अधिवेशनाच्या वेळी कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या समोर कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीची १८.७८ एकड भुखंडाची मागणी करिता सर्व पक्षीय नागरिकांनी, कृती समिती व व्यापारी संघटने च्या वतीने माजी आमदार डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरु केले होते. अधिवेशनाच्या कार्यकाळा पासून तर शेवटच्या दिवसापर्यंत पर्यंत साखळी उपोषण सुरु होते. परंतु नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, खासदार मा.कृपाल तुमाने, आमदार मा.आशिष जयस्वाल, नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर यांनी उपोषण स्थळी भेट न दिल्याने हे राज्य सरकार गोर -गरीब व्यावसायिकांचे कि, मोठे उद्योगपतींच अशा चर्चेला उधाण आले आहे. कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या मालकीची संपुर्ण १८.७८ एकड भुखंड ग्रोवर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकास कार्य आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाले. सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटने द्वारे नगर परिषद समोर ठिय्या आंदोलन व साखळी उपोषण केले. मात्र अद्याप कुठलाही प्रशासनाकडून निर्णय लागला नाही.
मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटने च्या पदाधिकार्यांनी नगरपरिषदेला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनी च्या जमीनीवर मार्केट यार्ड, हॉकर्स झोन, साप्ताहिक व गुजरी बाजार, भाजीपाला विक्रेता गाडे, बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोगात घेण्याची मागणी केली होती. परंतु नगर परिषद प्रशासनाने सदर विषयाकडे गंभीर्याने लक्ष केन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन ग्रोवर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकास कार्यावर प्रश्न निर्माण झाले. यातच समोर फुटपाथ वर लागलेले गोर गरिबांची दुकाने हटविण्याची चर्चा असुन त्याचा परिवारा वर भुखमारी येण्याची शक्यता नाकारता येत नसुन नगर परिषद प्रशासन या दुकानदारांच घर चालविणार काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनी ची जागा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करण्या करिता अति आवश्यक असल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटने च्या पदाधिकार्यांनी माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलनाची भुमिका घेतली होती. परंतु साखळी उपोषण होऊन एक महिना झाला असुन आंदोलन कर्ते कुठे लपुन बसले. फक्त आंदोलन फोटो सेशन, फेसबुक, सोशल मीडिया साठी होते का ? छोटे मोठे व्यापारांना, नागरिकांना दिखावा साठी आंदोलन होते का ? अशा उलट सुलट चर्चा शहरात रंगत आहे. इतकेच नव्हे तर हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा नगर परिषद प्रशासनच्या हाता मधून गेल्याने शहरातील भविष्य अंधारात व धोक्यात आले आहे. याला जबाबदार कोण ? सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटना माजी आमदार डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात हिंदुस्तान लिव्हर कंपनी जागेची मागणी साठी आंदोलनाची भुमिका घेतली. व्यापारांना जागा मिळणार अशी आशा होती परंतु हे पदाधिकारी लपुन बसल्याने व्यापारांनी कस जागावे ? आणि कूठल्या जनप्रतिनिधि कडे जावे असा चिंतेचा विषय बनला आहे.
Post Views: 202
Mon Jan 23 , 2023
शंकर पंटाच्या निमित्ताने खडी गंम्मततीने वेधले लक्ष कन्हान,ता.२१ जानेवारी दोन वर्षं कोरोनाचे सावट असल्याने कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेता आले नसल्या कारणाने यावर्षी मात्र नविन वर्ष व संक्रांतीच्या निमित्ताने गरदेव चौक मौदा येथे शंकर पट निमित्त राष्ट्रीय खडी गंम्मत चे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.बोंद्रे, राजेश निनावे, […]