तारसा रोड चौकात अनावश्यक फिरणा-या ६४ लोकांची अँटीजेन तपासणी. 

तारसा रोड चौकात अनावश्यक फिरणा-या ६४ लोकांची अँटीजेन तपासणी. 


कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड चौक येथे कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या सहकार्याने मोबाईल बुथ मोहीम राबवुन अनावश्यक फिरणा-या २८ लोकांची कोव्हीड-१९ अँटीजेन तपासणी करण्यात आली. 

     गुरूवार (दि.२७) व (दि.२८) मे ला कन्हान पोलीस स्टेशन थानेदार अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांचे सहकार्याने मोबाईल बुथ मोही म राबवुन तारसा रोड चौक कन्हान येथे अनावश्यक फिरणा-या (दि.२७) ला २८ व (दि.२८) मे ला ३६ अश्या ६४ लोकांची कोव्हीड-१९ अँटीजेन तपासणी करण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह आढळुन आले. सदर मोहीम ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ योगेश चौधरी, तांत्रिक सहाय्यक श्वेता मेश्राम, आरोग्य सहा य्यक सुरेंद्र गि-हे, अजय राऊत, चालक गौरव भोयर, पोस्टे कन्हान चे पोहवा जयलाल सहारे, नापोशि राजेंद्र गौतम, पोशि विरेंद्रसिंह चौधरी, मुकेश जैस्वाल आदीने यशस्विरित्या पार पाडली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्व.पंतप्रधान श्री.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 57 व्या पुण्यतिथि सोहळा साजरा

Fri May 28 , 2021
स्व.पंतप्रधान श्री.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 57 व्या पुण्यतिथि सोहळा साजरा कन्हान ता 27 : सार्वजनिक वाचनालय येथे स्व.पंतप्रधान श्री.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 57 व्या पुण्यतिथि कार्यक्रम कोवीड 19 अंतर्गत (दि 27) गुरूवार रोजी सांयकाळी 5 वाजता हनुमान नगर वाचनालय येथे आयोजित कार्यक्रम पार पाडला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश कोल्हे […]

You May Like

Archives

Categories

Meta