देशी दारूचा १८२ पाव बॉटल सहीत दोन आरोपीना अटक : कन्हान पोलिसांची मोठी कारवाई 

देशी दारूचा १८२ पाव बॉटल सहीत दोन आरोपीना अटक 

#)  एक लाख चार हजार दोनशे रूपयाच्या मुद्देमाल जप्त.  


कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा-कांद्री टोल नाका शिवारात अवैद्यरित्या दारू विकत असल्याच्या गुप्त माहीतीवरून कन्हान पोलीसांनी दोन आरोपीना पकडुन त्याच्या ताब्यातील देशी दारूच्या १८२ नीप व दुचाकी १ लाख ४ हजार २ शे रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीना अटक केली. 

          कन्हान पोलीस स्टेशन थानेदार सुजितकुमार श्रीरसागर हयांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून कन्हान पोलीसानी पेट्रोलींग करित रविवार (दि.११) ला सकाळी ८ ते ९ वाजता दरम्यान आरोपी बाबु रामसेवक कश्यप वय ३८ वर्ष रा. खदान नं.३ व आरोपी विजय दुर्गाप्रसाद तिवारी वय ३८ रा.खदान नं.६ हे दोघे मोटार सायकल वर अवैद्यरित्या दारू विकताना बोरडा, कांद्री टोल नाका शिवारात मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातील देशी भिंगरी दारूच्या १८२ नीपा १८० मिली असलेल्या किंमत १९२०० रूपये व मोटरसाइकिल क्र. एम एच ४० सी एफ ०२४० किंमत ८५ हजार रूपये असा एकुण १ लाख ४ हजार दोनशे रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी बाबु रामसेवक कश्यप व विजय दुर्गाप्रसाद तिवारी विरूध्द कलम६५ (अ) (इ) महा. दारू बंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून अटक करित कारवाई केली. ही कार्यवाही कन्हान थानेदार (परी.पो. उप अधिक्षक) सुजीतकुमार श्रीरसागर यांचे मार्गदर्शनात सपोनि सतिश मेश्राम, सपोनि अमितकुमार आत्राम, पोशि सुघिर चव्हाण, शरद गिते, संजु बरोदिया हयांनी यशस्विरित्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात चार कोरोना रुग्ण दगावले : कन्हान

Tue Apr 13 , 2021
जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात चार कोरोना रुग्ण दगावले सुनील सरोदे कन्हान (जि. नागपूर): पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषद अध्यक्ष रश्‍मी बर्वे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कन्हान तालुक्यातील कांद्री येथील वेकोलिच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयात कोविड सेंटर तयार केले. पण तेथे डॉक्टरांसह आवश्‍यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज सकाळी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta