कोळसा चोरून ट्रक मध्ये भरून पळालेल्या आरोपी व ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल ; अवैद्य कोळसा चोरीवर अंकुश कोण लावेल ?

कोळसा चोरून ट्रक मध्ये भरून पळालेल्या आरोपी व ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल

#) अवैद्य कोळसा चोरीवर अंकुश कोण लावेल ?

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि इंदर खुली कोळसा खदान चा कोळसा चोरून अवैद्यरित्या ट्रक मध्ये भरून पसार झालेल्या दोन आरोपी विरूध्द वेकोली सुरक्षा अधिकारी यांचे तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपी चा शोध घेत आहे.
कन्हान शहराला लागुन जवळजवळ वेकोलि च्या कामठी, इंदर व गोंडेगाव अश्या तीन खुली कोळ सा खदान असुन कोळसा चोरी चा गौरख धंदा ट्रक व दुचाकी वाहनाचा वापर करून जोमाने सुरू असुन बिनधास्त दुचाकी वाहनावर तीन चार बो-या कोळसा लादुन कामठी व नयाकुंड कडे पहाटे सकाळ पासुन दिवस भर सुरू असुन सुध्दा वेकोलि अधिकारी व कन्हान पोलीस अधिकारी आणि पोलीस मुक दर्शका ची भुमिकेत असल्याची नागरिकात चर्चेला ऊत येत आहे. मंगळवार (दि.१४) डिसेंबर ला रात्री १० ते १०.३० वाजता दरम्यान वेकोलि इंदर खुली कोळसा खदान मधिल कोळसा भुजंग महल्ले व ट्रक क्र एम पी २० २०९० चा चालक यानी संगणमत करून इंदर कोळसा खदान चा कोळसा चोरून अवैद्यरित्या ट्रक क्र एम पी २० २०९० मध्ये ८ टन कोळसा भरून ट्रक घेऊन पळाल्याने वेकोलि सुरक्षा अधिकारी संतोष यादव यानी कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी आरोपी १) भुजंग महल्ले राह. टेकाडी व २) ट्रक क्र एम पी २० २०९० चा चालक यांचे विरूध्द चोरी चा गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात पो कॉ मंगेश ढबाले पुढील तपास करित दोन्ही आरोपी व ट्रक चा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आरोपी जवळुन बनावटी मॉऊझर किंमत ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

Thu Dec 16 , 2021
स्थागुअ शाखा पथकाने बनावटी मॉऊझर आरोपी च्या घरून केली जप्त #) आरोपी जवळुन बनावटी मॉऊझर किंमत ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान उपविभागात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवित शिवाजी नगर कन्हान येथील शाहरुख खान व त्यांच्या घराची झडती घेत एक देशी बनावटीची माऊझर किमत […]

You May Like

Archives

Categories

Meta