शाहु महाराजांच्या जयंती निमीत्त कौशल्य विकास प्रशिक्षण

शाहु महाराजांच्या जयंती निमीत्त कौशल्य विकास प्रशिक्षण

कन्हान,ता.२७ जून

     नगर परिषद कार्यालय मार्फत कौशल विकास केंद्र येथे डीजीटल कौशल विकास प्रशिक्षण सोमवार (ता.२६) जून रोजी समाजभवन, सार्वजनिक वाचनालय, हनुमान नगर, कन्हान येथे आयोजित करण्यात आले होते.

    ‘ई’ लायब्ररीच्या इमारतीत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कन्हान-पिपरी नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर तर प्रमुख पाहुणे प्रकाश नाईक, वसंत इंगोले उपस्थित होते. प्रसंगी राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत शिक्षणविषयक कार्याविषयी मार्गदर्शन केले. तर कौशल विकास केंद्र येथे आधुनिक कौशल विकासातून रोजगार निर्माण करायला लागणाऱ्या डीजीटल कौशल विकास प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व महिला वर्ग उपस्थित होते. शाहु महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी प्रशिक्षण निखाडे सर व त्यांच्या चमुद्वारे देण्यात आले.

   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश बर्वे, मनोहर कोल्हे, स्वप्नील इंगोले, रोशन तांडेकर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विद्यार्थ्यांचा व्दारे अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती रैली

Wed Jun 28 , 2023
विद्यार्थ्यांचा व्दारे अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती रैली कन्हान,ता.२६ जुन       कन्हान-पिपरी पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात दहावी व बारावीच्या शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना पोलिसांच्या व्दारे अंमली पदार्थ वापर करण्यावर आळा घालण्यासाठी तसेच त्यांचे दुष्य परिणामकारक विषयी कार्यशाळा घेण्यात आली. तसेच मार्गदर्शन करून अंमली पदार्थाचे दुष्य परिणामाचे फलक लावुन जनजागृती रैली […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta