गुरुपौर्णिमा निमित्य गुरूपुजा कार्यक्रम थाटात साजरा

 गुरुपौर्णिमा निमित्य गुरूपुजा कार्यक्रम थाटात साजरा

कन्हान : – परिसरातील कन्हान, कांद्री आणि टेकाडी येथे गुरुपौर्णिमा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करून भजन, किर्तन, पुजा अर्चना करून मान्यवरांचा सत्कार व खीर वितरणासह विविध कार्यक्रमाने गुरू पुजा थाटात साजरा करण्यात आला.

कांद्री येथे डहाका मंडळा व्दारे गुरूपुजा थाटात साजरी

शिवशक्ती डहाका मंडळ कांद्री तर्फे जय संताजी नाऱ्याचे जनक, लोकशाहीर वस्ताद स्व.भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या समृर्ती प्रित्यर्थ डहाका मंडळा व्दारे कोल माईन्स रोड, हनुमान मंदिर कांद्री कन्हान येथे गुरूपुजा थाटात साजरी करण्यात आली.
गुरूपुजा कार्यक्रमाची सुरूवात आकाशवाणी, कॅसेट सिंगर शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांचे हस्ते व प्रमुख अतिथी कांद्री सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच शामकुमार (बबलु) बर्वे यांच्या उपस्थितीत विधीवत पुजा अर्चना करून गुरूपुजा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तदंतर मंदिरात भजन, कीर्तन व डहाका सादर करून आयोजकांनी सर्वांचे आभार व्यक्त करून गुरुपुजा कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बंटी आकरे, छोटु सिंग, शिवाजी चकोले, कवडु आकरे, झिबल सरोदे, एकनाथ सरोदे, वासुदेव आकरे, रामा हिवरकर, उषा वंजारी, उषा वाडीभस्मे, इंदु टेमरे, मधुकर काबळे, फजित बावने, सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता शाहीर विक्रम वांढरे, ब्रम्हा नवघरे , वामन देशमुख, प्रविण आकरे, मनोज, अशोक किरपान, राजेश पोटभरे, विजय आकरे, भोजराज वासाडे, शालीकराम शेंडे, गिरधर बावने, नितेश वांढरे सह नागरिक उपस्थित राहुन सहकार्य केले.

त्रिशरण बौद्ध विहार, कांद्री

कांद्री संताजी नगर येथील त्रिशरण बौद्ध विहार येथे गुरुपौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून भगवान गौतम बुद्ध यांचे मुर्ती चे अनावरण व परित्राण पाठ करून खीर वाटप करून गुरूपौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भगवान नितनवरे, कैलाश शेंडे, भोजराज राउत, प्रल्हाद वाघमारे, सुदाम नितनवरे, भीमराव डोंगरे, धर्मेंद्र गणवीर, सचिन वास निक, सिंधु वाघमारे, रमा वासनिक, शिला गणवीर, रत्नमाला चव्हाण सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

श्री हनुमान मंदिर टेकाडी, कन्हान

श्री हनुमान मंदिर टेकाडी येथे गुरूपौर्णिमा निमित्य मंदिरात विधिवत पुजा अर्चना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. भजन संध्याचा भक्ति पर गिताचा कार्यक्रम जय रघुनन्दन भजन मंडळ टेकाडी द्वारे सादर करण्यात आला. भजन कीर्तन करून गुरुपौर्णिमा निमित्य गुरूपुजा कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला .याप्रसंगी ललित चिचुलकर, मनोज लेकुरवाडे, प्रज्वल गाडबैल, सौरभ नाकतोडे, लोकेश चिंचुलकर, नंदु सातपैसे, अंकित लक्षने, भावेश गोले, आकाश गाडबैल, आकाश घोगरे, मयुर सेलोकर, भुषन खोरे, अभी वासाडे, हर्श बोराडे सह भाविक नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

गुरू पौर्णिमा निमित्त आखाडा वस्ताद मोहन वकलकर व्दारे शस्त्र पुजन

 

गुरूपौर्णिमा निमित्त शिवकालीन शस्त्र विद्या जोपासणारे वस्ताद मोहन वकलकर निमखेडा यांचे हस्ते गुरूपौर्णिमा निमित्त शस्त्र पुजन करून गुरू पुजा करण्यात आली. निमखेडा येथिल अखाडा वस्ताद मोहन वकलकर व त्यांचे गुरूवर्य वस्ताद कृष्णाजी मरस्कोल्हे यांच्या कार्यामुळे आजुबाजुचा गावा मध्ये ही शिव कालीन शास्त्र कला जोपासली जात आहे. परमात्मा एक दानपट्टा व मर्दानी आखाडा निमखेडा नाव लौकिकास येत आहे. येथील खेडाळुनी जिल्हा, राज्यासह इतरही राज्यात या शिवकालीन कलेचे उत्कुष्ट सादरीकरण करून पुरस्कार प्राप्त करून नाव लौकीक मिळविला आहे. यास्तव गुरू कर्तृत्वाची पांग म्हणून फुल ना फुलाची पाकळी च्या स्वरूपात सर्व अखाडा शिष्या व्दारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमे पुष्पहार अर्पण करून शस्त्र पुजन आणि गुरूवर्य वस्ताद कृष्णाजी मरस्कोल्हे व वस्ताद मोहन वकलक यांना नमन करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वस्ताद शालिकजी सांभारे, वस्ताद कवडुजी वकलकर, वस्ताद लहानुजी वकलकर, गंगाधर नागपुरे, राजेंद्र सांभारे, घनश्याम घरजाडे, निलेश गाढवे, श्याम मस्के, राहुल वकलकर, अविनाश वकलकर, महेश बावणे, प्रतिक सांभारे, संकेत नागपुरे, साहिल कोंगे, अरविंद चौधरी, राजुजी सुर्यवंशी, कृष्णा चौधरी सह ग्रामस्थ व खेळाडु शिष्य उपस्थित राहुन गुरू पुजन कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.

केरडी येथे गुरूपुजा कार्यक्रम थाटात साजरा

जय बजरंग व्यायान शाळा केरडी व्दारे व्यायाम शाळेत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष मा दयारामजी भोयर यांच्या अध्यक्षेत गुरूपौर्णिमा निमित्य विधीवत पुजा अर्चना करून प्रसाद वितरण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा दयाराम भोयर हयानी गुरू मार्गावर चालुन सत्कर्म कमविण्याचा उपदेश करण्यात आला. याप्रसंगी श्री पांडुरंगजी काठोके, प्रविण सेलारे, देवाजी भोयर, पुरूषोत्तम हिवसे, तुकाराम वानखेडे, भोजराज टेंभरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता राजेन्द्र वाटकर, गौरव भोयर, सचिन फलके, रामभाऊ हिवसे, जनार्दन पांडे, रविन्द्र महले, वसंता भोंगाडे, प्रशांत ठाकरे, अभिलाश मानवटकर, दादाराव पाटील सह ग्रामस्थानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ट्रक च्या धडकेत दुचाकी चालकाचा मुत्यु तर एक गंभीर जख्मी

Sat Jul 16 , 2022
 ट्रक च्या धडकेत दुचाकी चालकाचा मुत्यु तर एक गंभीर जख्मी कन्हान : – दोघे पेंटर, पेंटीग चे काम आटोपून मनसर वरून नागपूर कडे दुचाकीने येत असताना बंद टोल नाका वराडा शिवारात चारपदरी महामार्गावर बारा चाकी ट्रकने वळण घेऊन दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दुचाकी चालक पवन ढोरे याला नेतांना मुत्यु झाला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta