भारतीय टेनी-कोइट संघात संजय चेटूले यांची निवड

भारतीय टेनी-कोइट संघात संजय चेटूले यांची निवड

नागपूर,ता.७ जूलै

   भारतीय टेनी-कोइट संघात, वैनगंगा स्पोर्टिंग भंडारा येथील खेळाडू संजय माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेंडर यांची निवड झाली.
दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या वर्ल्ड कप टेनी-कोइट चॅम्पियनशिप मध्ये होणाऱ्या (दि.३०) सप्टेंबर ते (दि.८) ऑक्टोंबर २०२३ रोजी यात सहभागी होणाऱ्या भारतीय संघात, भंडारा येथील वैनगंगा स्पोर्टिंग चे खेळाडू संजय माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेंडर यांची चेन्नई येथे झालेल्या इंडिया टीम सिलेक्शन कॅम्प मधून निवड झाली आहे.

   दोघेंही महाराष्ट्र संघाचे स्टार खेळाडू आहे. त्यांनी अनेक वर्षापासून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राला बरीच पदके प्राप्त करून दिली. त्यांना महाराष्ट्र टेनी,-कोइट असोसिएशन चे माजी अध्यक्ष ॲड.मधुकांत बांडेबुचे, राष्ट्रीय पंच अरुण बांडेबुचे व राष्ट्रीय रेफ्रि बोर्ड सदस्य आणि महाराष्ट्र असोसिएशन कोषाध्यक्ष ॲड.मृणाल बांडेबुचे यांचे मार्गदर्शन प्रशिक्षण व सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव तथा राष्ट्रीय संघ निवड समिती सदस्य अनिल वरपे पुणे यांनी देखील खेळाडूंच्या निवडीसाठी विशेष परिश्रम घेतले.

    भंडारा डिस्ट्रिक्ट असोसिएशन व वैनगंगा स्पोर्टिंग भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले. सर्व स्तरातून संजय चेटूले यांची कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शाहीरांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिल -चंद्रपाल चौकसे शासनाने शाहीर कलाकारांच्या मागण्या लवकर पूर्ण करावे - शा.राजेंद्र बावनकुळे "अबकी बार किसान आणि शाहीर कलाकार सरकार" - कवी वाकुडकर

Sat Jul 8 , 2023
शाहीरांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिल -चंद्रपाल चौकसे शासनाने शाहीर कलाकारांच्या मागण्या लवकर पूर्ण करावे – शा.राजेंद्र बावनकुळे “अबकी बार किसान आणि शाहीर कलाकार सरकार” – कवी वाकुडकर नागपूर,ता.७ जूलै     भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा हजारोंच्या उपस्थितीत राम मंदिर सभागृह येथे उत्साहात पार पडला. शाहीर कलावंतांनी आपल्या […]

You May Like

Archives

Categories

Meta