अखेर जख्मी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु  गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचे वर्चस्व निर्माण होणार काय?

अखेर जख्मी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु

गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचे वर्चस्व निर्माण होणार काय?

कन्हान,ता.०६ मार्च

      शहरातील वाढत्या बेरोजगारीमुळे व्यसानाधिन तीन युवक आंबेडकर चौक येथे रविवारच्या रात्री दारूचा नशेत चकलस करित उभे होते. योगेश याने अचानक सागर च्या छातीवर चाकु ने सपासप वार करुन गंभीर जख्मी केले. युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झालयाने आरोपी योगेश राईकवार याला अटक करुन त्याचा विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

        होळीच्या सणाला शहरात धक्कादायक घटना घडल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. नागरिकां मध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण होऊन कन्हान शहर सुरक्षित कीती ? अशा चर्चेला उधाण आले असुन पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवार (दि.५) मार्च ला रात्री ११ वाजता दरम्यान आंबेडकर चौक येथे तीन युवक आपसात चकलस करित वाद- विवाद झाला. विवाद इतका विकोपाला गेला की, योगेश संजय राईकवार (वय ३३) रा.आंबेडकर चौक, कन्हान याने सागर कालीचरण यादव (वय २५) रा. हरिहरनगर, कांद्री याचा छातीवर धारदार चाकुने सपासप दोन घाव मारून गंभीर जखमी केले. जखमी सागर याने स्वतःला वाचविण्या करीता घटनास्थळा वरून पळ काढला. आरोपी योगेश याने जीवे मारण्याचा उद्देशाने पाठलाग केला परंतु मृतक सागर हाथी न लागल्याने थोडक्याात प्राण वाचले होते. घटने ची माहिती नागरिकांनी कन्हान पोलीसांना दिली अस ता कन्हान गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशंवत कदम , सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, वैभव बोर पल्ले, हरिष सोनभ्रदे, महेंद्र जळीतकर, गणपत सायरे हे घटनास्थळी पोहचले. नागरिकांनी तिघेही युवक तारसा चौकाच्या दिशेने पळाल्याचे सांगिल्याने पोलीसांनी शोधा सुरू केले. मृतक सागर यादव स्ट्रेट बैंक समोर खाली पडलेला मिळुन आल्याने पोलीसांनी प्रथम उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. डॉक्टरांनी प्रथम उपचार करुन मेयो रुग्णा लय नागपुर येथे हलविण्यात आले होते. सदर घटना गंभीर्याने घेत उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांचे मार्गदर्शनात आरोपींचा शोध घेत. पोलीसांनी आरोपी योगेश राईकवार ला रात्री त्याचे घरुन ताब्यात घेतले. सोमवार (दि.६) मार्च ला ऐन होळीच्या दिवशी सकाळी ६ वाजता दरम्यान शासकीय मेयो रुग्णालय नागपुर येथे जख्मी युवक सागर यादव याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाले. कन्हान पोलीसांनी फिर्यादी ताराबाई कालीचरण यादव रा. हरिनगर कांद्री कन्हान यांच्षा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी योगेश राईकवार विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, कन्हान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्श नात सहायक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

निलज ला जागतिक महिला दिन थाटात साजरा एकलक्ष महिला ग्रामसंघ, ग्रा.प.निलज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम साजरा.  ग्रामोन्नती प्रतिष्ठान व्दारे १९० महिलांना साडी सप्रेम भेट

Wed Mar 8 , 2023
निलज ला जागतिक महिला दिन थाटात साजरा एकलक्ष महिला ग्रामसंघ, ग्रा.प.निलज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम साजरा. ग्रामोन्नती प्रतिष्ठान व्दारे १९० महिलांना साडी सप्रेम भेट कन्हान,ता.०८ मार्च      एकलक्ष महिला ग्राम संघ व ग्राम पंचायत निलज यांच्या संयुक्त विद्यमाने निलज येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलीचे सांस्कृतिक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta