गुणवत्तेच्या जोरावर आकाशाला गवसणी घाला-शिवाजी चकोले
धर्मराज प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहभोजन

कन्हान,ता.२ फेब्रुवारी
बालवयातच गुणवत्ता हेरण्याचा प्रयत्न धर्मराज प्राथमिक शाळे तर्फे करण्यात येत आहे. याच गुणवत्तेच्या जोरावर आकाशाला गवसणी घाला व शाळेचे आणि गावाचे नाव मोठे करा असे आवाहन ग्राम पंचायत कांद्री चे माजी सदस्य श्री शिवाजी चकोले यांनी केले.
धर्मराज प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहभोजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत कांद्रीचे माजी सदस्य श्री. शिवाजी चकोले तर प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.धनंजय कापसीकर, मुख्याध्यापक श्री.खिमेश बढिये, पालक प्रतिनिधी सौ.सोनुताई पोटभरे, पर्यवेक्षक श्री.सुरेंद्र मेश्राम उपस्थित होते. वार्षिक बक्षीस वितरण समारंभात वर्षभर राबविण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धा, वाचन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सलाद स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा, संविधान पाठांतर स्पर्धा व इतर स्पर्धा मधिल २०४ विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौर विण्यात आले.
यावेळी सर्व पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापुर्ण शिक्षण व स्पर्धात्मक वातावरणासाठी धर्मराज प्राथमिक शाळेचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या ध्यापक श्री.खिमेश बढिये यांनी करुन शाळेचा २५ वर्ष पूर्ती निमित्त गौरवशाली इतिहासाची पाने चाळत विद्या र्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्री.भिमराव शिंदेमेश्राम व श्री.अमीत मेंघरे यांनी केले. आभार श्री.राजु भस्मे यांनी मानले. बक्षीस वितरण समारंभा नंतर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री.किशोर जिभकाटे, कु.हर्षकला चौधरी, कु.शारदा समरीत, कु अर्पणा बावनकुळे, सौ.चित्रलेखा धानफोले, कु.प्रिती सुरजबंसी, कु. पूजा धांडे, कु.कांचन बावनकुळे, सौ.वैशाली कोहळे, सौ.कविता साखरकर, सौ.गिरडकर, सौ.सुलोचना झाडे, सौ.नंदा मुद्देवार, सौ सुनिता बर्वे, सौ.उषा नाटकर, सौ.परिणिता अनकर यांनी सहकार्य केले.
Post Views:
569