मा. सुनिल केदारांचे टेकाडी (कोख) सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे स्वागत करून समस्या सांगितल्या

मा. सुनिल केदारांचे टेकाडी (कोख) सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे स्वागत करून समस्या सांगितल्या

कन्हान : – वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्राच्या खुली कोळसा खदान प्रशासना व्दारे निर्माण समस्या जाणुन घेण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, युवा क्रिडा मंत्री मा ना सुनिल केदार यांच्या दौ-यात टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम यांनी जंगी स्वागत करून पंचायत अंतर्गत प्रलंबित समस्यांशी अवगत केले. 

        संकल्प श्रमिक सभागृह गोंडेगाव कॉलोनी येथे   जिल्हा परिषद टेकाडी (कोख) व गोंडेगाव सर्कल अंतर्गत वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत तीन खुली कोळसा खदानमुळे निर्मित गावात व गावक-या च्या समस्या जाणुन घेण्या करिता महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, युवा क्रिडा मंत्री ना सुनिल केदार यांच्या दौ-या दरम्यान टेकाडी (कोख) सरपंचा सुनिता पुथ्वीराज मेश्राम व सदस्यानी मा ना सुनिल केदार यांचे स्वागत करून नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी, स्थानिय युवकांची बेरोजगारी, ४ नंबर व बांधा दफाई यांचे पुनर्वसनाकरिता पट्टे वाटप तसेच इतर प्रलंबित समस्याशी अवगत करून समस्या निवारणा करिता विनती केली.

याप्रसंगी जि प अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे, सभापती मिनाताई कावळे सह मान्यवर जनप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ध्वजारोहन करून कन्हानला वैभव प्राप्त करण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचा शुभारंभ

Thu Jan 28 , 2021
ध्वजारोहन करून कन्हानला वैभव प्राप्त करण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचा शुभारंभ कन्हान : – एकेकाळी महाराष्ट्र राज्यात क्रमाक २ ची ग्राम पंचायतीचे नगरपरिषदेत रूपातंर होऊन सुध्दा नागरिकांना मुलभुत सोयीसुविधेचा अभावाने नागरिक त्रस्त असुन समस्या वाढुन शहरीकरणाने अराजकता वाढुन सर्वसामान्य लोक चांगलेच अडचणीत आल्याने कन्हान चे सुज्ञ व विचारवंत नागरिक सामोर येत गावातील […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta