जिल्हास्तरीय १७ वी आष्टे-डू मर्दानी आखाडा स्पर्धेत पारशिवनी तालुका अव्वल

जिल्हास्तरीय १७ वी आष्टे-डू मर्दानी आखाडा स्पर्धेत पारशिवनी तालुका अव्वल

शिवा अखाडा खेडी ११, नवयुवक अ.खेडी ११, जगदंबा अ.बोरी ८,परमात्मा अ.निमखेडा ५ पदक.

कन्हान,ता. ०५ ऑगस्ट

 आष्टे-ड  र्दानी अखाडा असोशियशन व्दारे १७ वी जिल्हास्तरिय आष्टे-ड शिवकालीन शास्त्रविद्या स्पर्धेत पारशिवनी तालुक्यातील अखाडा मंडळाने १३ सुवर्ण, १४ रजत व ८ कास्य असे ३५ पदक मिळवित जिल्हयात पारशिवनी तालुक्याने अव्वल स्थान पटकाविले आहे.
रामटेक येथे (दि.३१) जुलै ला आष्टे-डू मर्दानी अखाडा असोशियशन व्दारे १७ वी जिल्हास्तरीय आष्टे-डू शिवकालीन शास्त्रविद्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आष्टे-डू मर्दानी आखाडा असोसिएशन महाराष्ट्र चे सचिव राजेश तलमले, आष्टे-डू मर्दानी आखाडा असोशियशन नागपुर ग्रामिण सचिव बाबा कावरे, आष्टे-डू मर्दानी आखाडा असोशियशन नागपुर ग्रामिण प्रशिक्षक मोहन वकलकर व अखाडा वस्ताद आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित स्पर्धा घेण्यात आली. नागपुर जिल्हयातील बहुतेक मर्दानी अखाडा मंडळानी शिवकालीन शास्त्रविद्या म्हणजे काठी, भन्नाटी, तलवार, भाला, दानपट्टा आदीच्या उत्कृष्ट कलागुणाचे सादरीकरण करण्यात आले. यात परमात्मा एक दांडपट्टा मर्दानी आखाडा निमखेडा मंडळाचे गौरव बावणे, हर्ष मल्लेवार, सावी वकलकर, छकुली बावणे या खेडाळुनी सुवर्ण पदक, सुवर्णा महेश बावणे कास्य पदक, शिवा वस्ताद दानपट्टा आखाडा खेडी चे प्रांकेत नागपुरे, प्रणव ठाकरे, अवनी कुथे, सावनी ठाकरे सुवर्ण पदक, समीक्षा नागपुरे, सोमा ठाकरे, सोम्या ठाकरे, विधी कोचे यांनी रजत पदक, प्रतिक चांभारे, प्रतिज्ञा नागपुरे, रजनी ठाकरे यांनी कास्य पदक, नवयुवक दानपट्टा मंडळ खेडी च्या नकुल ज्ञानेश्वर गजबे सुवर्ण, मोनिष विजय मरस्कोल्हे, चेतन संजय गजबे, विजय सुरेश गजबे, अश्विन तेजराम नारनवरे, सौरव हेमराज फुकटे, नंदिनी सुरेश शेंडे यांनी रजत पदक, अनुराग सुरेश शेंडे, साहील रामदास मेश्राम, कुणाल बबन नारनवरे, कुंदन सुभाष मेश्राम कास्य पदक, जगदंबा मर्दानी आखाडा बोरी च्या विरेंद्र वैद्य, शौर्य तिरोडे, हिमांशु मंगर, अश्मिता उके सवर्ण, हर्षिका नागमोते, तनुज नागमोते, तुषार उके, विनित ऊके यांनी रजत पदक प्राप्त करून या पारशिवनी तालुक्यातील अखाडा मंडळाने १३ सुवर्ण, १४ रजत व ८ कास्य पदक असे एकुण ३५ पदक प्राप्त करून पारशिवनी तालुक्याने नागपुर जिल्हयात अव्वल स्थान पटकाविले आहे.

सुवर्ण रजत कास्य एकुण
१) शिवा खेडी ४ ४ ३ = ११
२) नवयुवक खेडी १ ६ ४ = ११
३) बोरी ४ ४ – = ०८
४) निमखेडा ४ – १ = ०५
________________________________________
एकुण १३ १४ ८ = ३५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

युवासेनेव्दारे धर्मराज विद्यालयात वृक्षवाटप

Fri Aug 5 , 2022
  युवासेनेव्दारे धर्मराज विद्यालयात वृक्षवाटप वृक्ष वाटप करताना मुख्याध्यापक खिमेश बढिये. कन्हान, ता.05 ऑगस्ट     धर्मराज विद्यालय कांद्री कन्हान येथे मुख्याध्यापक रमेश साखरकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, उपमुख्याध्यापिका श्रीमती तिळगुळे, पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम,पर्यावरण प्रमुख अनिल सारवे, युवासेना जिल्हा समन्वयक लखन समाजसेवक यादव, गजराज देविया, कन्हान शहरप्रमुख समीर मेश्राम यांच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta