साम्बो स्पर्धेत आरोही व सिध्दार्थ फुलझेले यांना सुवर्ण व रौप्य पदक जिल्ह्यातील दहा खेळाडुं पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक

साम्बो स्पर्धेत आरोही व सिध्दार्थ फुलझेले यांना सुवर्ण व रौप्य पदक

जिल्ह्यातील दहा खेळाडुं पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक

कन्हान,ता.02 ऑक्टोबर

   नुकत्याच राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा पुणे येथील लोणी काळभोर येथे पार पडलेल्या नागपुर जिल्ह्यातील १० खेळाडुंची निवड झाल्या पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक पटकाविले.

   यामध्ये बीकेसीपी स्कुल कन्हान च्या क्रीडा शिक्षक अमित ठाकुर यांनी स्वर्ण पदक तर  विद्यार्थी खेडाळु कु.  आरोही व सिध्दार्थ फुलझेले या कन्हान च्या बहिण,भावाने सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त करून शाळेचे, कन्हान शहराचे व नागपुर जिल्हयाचे नाव लौकिक केले.

   स्पोर्ट साम्बो असोसिएशन महाराष्ट्र व्दारे दुसरी राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा (ता.२३ व २४ सप्टेंबर २०२२ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकंदरीत संपुर्ण महाराष्ट्रातुन ३०० ते ३५० खेळाडुंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्यांची जम्मु आणि काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा पुणे येथील लोणी काळभोर येथे पार पडल्या. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी भारताचे सेंबो इंडिया असो सिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भागीरथ लाल व सेक्रेटरी मिस अरोरा या प्रामुख्याने उपस्थित होत्या. नागपुर जिल्ह्यातील दहा खेळाडुंची या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यापैकी पाच खेळाडुंनी सुवर्णपदक व दोन खेळाडुंनी रजत पदक प्राप्त केले आहे. यात कु.आरोही फुलझेले, सिद्धार्थ फुलझेले, शरद मस्के,भुमेश चौरे, अमित राजेंद्र ठाकुर, क्षितिज रूपचंद सिरीया, हर्षल हुकुमचंद बडेल यांनी विजय मिळविला आहे.  विशेष म्हणजे कन्हान चे ४ व कामठी चे ३ असे सात खेडाळुनी नागपुर जिल्ह्यासाठी राज्य स्पर्धेत पदक पटकाविले. बीकेसीपी स्कुल कन्हान चे क्रिडा शिक्षक अमित ठाकुर सर यांनी स्वर्ण पदक तर इयत्ता १० वी ची विद्यार्थींनी कु.आरोही योगेश्वर फुलझेले व इयता ६ वी चा विद्यार्थी सिद्धार्थ योगेश्वर फुलझेले या बहिण, भावाने सुवर्ण व रौप्य पदक पटकावित नागपुर जिल्ह याचे नाव लौकिक करित स्वत:ला गौरन्वित केले. हे दोन्ही खेळाडु बीकेसीपी स्कुल कन्हान शाळेचे क्रिडा शिक्षक अमित राजेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनात सराव करित असल्याने या विजेत्या खेळाडुंचे संस्था संचालक  राजीव खंडेलवाल, संस्था सचिव पुष्पा गेरोला व शाळेच्या मुख्याध्यापिचका कविता नाथ यांनी मनपुर्वक स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करित शुभेच्छा दिल्या. पुढच्या वाटचालीसाठी व राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पोर्ट साम्बो असोसिएशन महाराष्ट्रा चे सचिव शंकरकुमार उगाडे आणि नागपुर जिल्हा साम्बो असोसिएशन व्दारे खेळाडुंना शुभेच्छा देण्यात आल्या असुन कन्हान परिसरातुन अभिनंदना चा वर्षाव करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नगर परिषद कन्हान येथे शांतता समितिची बैठक संपन्न सण उत्सव शांततेत करण्याचे नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आव्हान

Sun Oct 2 , 2022
नगर परिषद कन्हान येथे शांतता समितिची बैठक संपन्न सण उत्सव शांततेत करण्याचे नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आव्हान कन्हान,ता.02 ऑक्टोबर   कन्हान नगर परिषद नवीन इमारत येथे बुधवार ला नवरात्र, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन आणि इतर सण उत्सव निमित्य शांतता समिति च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.  बैठकी मध्ये नप नगराध्यक्षा […]

You May Like

Archives

Categories

Meta