किरकोळ वादातून भरदिवसा घरात घुसून तरुणाची हत्या

किरकोळ वादातून भरदिवसा घरात घुसून तरुणाची हत्या

कन्हान, ता.०३
कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील खदान नंबर ६ इंदर काॅलरी पाण्याच्या टंकी जवळ किरकोळ वादातून भरदिवसा घरात घुसून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली असुन नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवार (दि.२) ऑक्टोबर दुपारच्या दरम्यान आरोपी आकाश राजभर (वय १९) रा.खदान नंबर सहा व मृतक सुनील चुन्नुलाल केवट (वय २०) रा.खदान नंबर सहा, कन्हान यांचात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. दुपारी २ वाजता बहीण संगीता सुशील केवट घरी कपडे धुत होती तर वडील चुन्नूलाल घरी जेवण करत असताना सुनील बाहेरून येऊन खोलीत झोपला. पाठोपाठ आकाश त्याची आई- वडील घरी आले. आकाश ने संगीता ला सुनील कुठे आहे ? असे विचारले असता, माहित नसल्याचे सांगितले. आकाश ने खिशातून चाकू काढून पाहण्यासाठी घरातील खोलीत गेला. खोलीत आकाश ने सुनिल ला मारहाण करण्यास सुरुवात केली असता आवाज ऐकून संगीता, वडील चुन्नूलाल आणि आकाश राजभर चे आई वडील हे चौघेजण खोलीच्या दिशेने धावले. आकाश ला सुनील पासून वेगळे करण्यास सुरुवात केली. यावेळी आकाश याने सुनील चा छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले . संगीता ने पती सुशील व शेजाऱ्यांच्या मदतीने सुनीलला कामठी येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासुण त्याला मृत घोषित केले.

   घटनेची गंभीर दखल घेत नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, कन्हान पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीसांनी केवट यांच्या तक्रारी वरून आरोपी आकाश राजभर याला अटक करून त्याच्या विरुद्ध ३०२, ४५२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

छ.शिवाजी राजे यांच्या शौर्य जागरण यात्रेचे कांन्द्री येथे जल्लोषात स्वागत

Sat Oct 7 , 2023
छ.शिवाजी राजे यांच्या शौर्य जागरण यात्रेचे कांन्द्री येथे जल्लोषात स्वागत कन्हान,ता.७     विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल द्वारे काढण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य जागरण यात्रेचे कांद्री परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.     छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव राज्याभिषेकाला ३६५ वर्षे आणि विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षे पूर्ण […]

You May Like

Archives

Categories

Meta