छ.शिवाजी राजे यांच्या शौर्य जागरण यात्रेचे कांन्द्री येथे जल्लोषात स्वागत

छ.शिवाजी राजे यांच्या शौर्य जागरण यात्रेचे कांन्द्री येथे जल्लोषात स्वागत

कन्हान,ता.७

    विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल द्वारे काढण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य जागरण यात्रेचे कांद्री परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव राज्याभिषेकाला ३६५ वर्षे आणि विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षे पूर्ण झाल्याने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल रामटेक विभाग द्वारे शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा शुक्रवार (दि.६) ऑक्टोंबर रोजी कोराडी येथुन भ्रमण करीत चनकापुर, खापरखेडा, पारशिवनी, पालोरा, आमडी फाटा मार्गाने होत नागपुर-जबलपुर चारपदरी राष्ट्रीय महामार्गा ने भारत माता चौक कांद्री येथे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आगमन झाले.

   विविध सामाजिक, राजकीय संस्था आणि नागरिकांनी फुलाच्या वर्षावाने, फटाके फोडुन जल्लोषात स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद नागपुर माजी अध्यक्षा सौ.रश्मीताई बर्वे, कांद्री ग्रा.माजी सरपंच बलवंत पडोळे, माजी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, सभापती करुणाताई भोवते, नरेश बर्वे, अतुल हजारे आदी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले. आयोजक अरुणजी चाफले, जयराजगी नायडु, अनिकेत चिखलखर, योगश जालंदर आदींनी भगवा दुप्पटा घालुन भव्य स्वागत केले.

संताजी नगर कांद्री येथे भुमिपुत्र युवा प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था द्वारे अध्यक्ष अतुल हजारे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये फुलाच्या वर्षावाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत जोरदार स्वागत करुन यात्रा कामठी कडे रवाना झाली.

   प्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे, वामन देशमुख, बैशाखु जनबंधु, महेश झोडावणे, राहूल टेकाम, गणेश सरोदे , योगराज आकरे, आशाताई कनोजे, दुर्गाताई सरोदे, रेखाताई शिंगणे, वर्षाताई खडसे, राजू देशमुख, रामभाऊ सावरकर, वसंतराव लोहकरे, केशवराव मस्के, अशोक कुंभलकर, शिवाजी चकोले, रानु शाही, संजय चोपकर, सुरेंद्र चटप, सौरभ पोटभरे, रोहित चकोले, अशोक चांभारे, मारोती बावने, अविनाश कामडे, विजय पोटभरे, नंदु बारई , सुनील चापले, गोपाल पाहुणे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

छगन बावनकुळे यास पंतप्रधान व्दारे हस्ताक्षर केलेले प्रमाणपत्र भेट  "परीक्षा पे चर्चा २०२३" स्पर्धेत छगन बावनकुळे यांची भरारी

Sat Oct 7 , 2023
छगन बावनकुळे यास पंतप्रधान व्दारे हस्ताक्षर केलेले प्रमाणपत्र भेट  “परीक्षा पे चर्चा २०२३” स्पर्धेत छगन बावनकुळे यांची भरारी  कामठी,ता.७       परीक्षा पे चर्चा २०२३ स्पर्धेत केंद्रीय विद्यालय, कामठी येथील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थी छगन राजेंद्र बावनकुळे यांने “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अधिक […]

You May Like

Archives

Categories

Meta