कन्हान गहुहिवरा रस्त्यावरून जड वाहतुक बंद करिता कन्हान -कांद्रीत कलंगीतुर्रा

कन्हान गहुहिवरा रस्त्यावरून जड वाहतुक बंद करिता कन्हान -कांद्रीत कलंगीतुर्रा

#) नगराध्यक्षाने दगड गाडुन जड वाहतुक बंद केली तर ट्रांसपोर्टरने काढुन जड वाहतुक सुरू.

#) एकमेका विरूध्द गुन्हा दाखल करण्याकरिता कन्हान पोलीस निरिक्षकास तक्रारीचे निवेदन.

कन्हान : – तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गा वरुन गेल्या बऱ्याच दिवसा पासुन कोळसा, रेतीचे १० ते २० चक्का ओव्हर लोड ट्रकाची जड वाहतुक सुरू झाल्याने अपघात होऊन अपघाताची दाट शक्यता वाढल्याने नागरिकांनी आदोलन करून नप प्रशासना ला जड वाहतुक बंद करण्याची मागणी केल्याने कन्हा न-पिपरी नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव मंजु र करून या मार्गावरून जड वाहतुक बंद केली होती. परंतु या रस्त्यावरून जड वाहतुक सातत्याने सुरु अस ल्याने नप प्रशासनाने गहुहिवरा चौक येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला जेसीबीच्या मदतीने गड्डे खोदुन सिमेंटचे मोठे दगड गाडुन जड वाहतुक बंद केली. असता कांद्री ग्रा प व ट्रान्सपोर्टर मालकांनी जेसीबीच्या मदतीने ते सिमेंटचे मोठे दगड काढुन जड वाहतुक सुरू केल्याने कन्हान नगरपरिषद व कांद्री ग्रा प मध्ये कलंगी-तुर्रा होत एक मेका विरूध्द गुन्हा दाखल करण्याकरिता कन्हान पोलीस निरिक्षकास तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे.
कन्हान गहुहिवरा चाचेर रस्त्यावरून नागरिक पहाटे सकाळी व सायंकाळी पायदळ फिरायला जात असतात व दिवसभर या रस्त्यावरून नागरिकांची चांग लीच वर्दळ असते. कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिव रा चाचेर रस्त्यावरून गेल्या बऱ्याच दिवसा पासुन को ळसा, रेतीचे १० ते २० चक्का ओव्हर लोड जड वाहतु क सुरू झाल्याने एकतर हा रस्ता १० ते १२ फुटाचा असुन जड वाहनांच्या वाहतुकीने रस्तावर व लगत गड्डे पडुन खराब झाल्याने इतर वाहनांना, नागरिकांना ये-जा करिता चांगलाच त्रास सहन करित असुन अपघात सुध्दा झाले. मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने स्थानिय नागरिकांनी जड वाहतुक बंद करण्याकरिता आंदोलन करून मागणी केल्याने कन्हा न-पिपरी नगरपरिषद येथे (दि.८) सप्टेंबर ला सर्व साधारण सभेत ठराव मंजुर करून जड वाहतुक बंद केली. तरी सुद्धा या रस्त्यावरून जड वाहतुक सुरू असल्याने कन्हान नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांनी पोलीस संरक्षणात गुरूवार (दि.२०) जानेवारी ला रस्त्याचा दोन्ही बाजुला जेसीबी च्या मदतीने गड्डे खोदुन मोठे सिमेंटचे दगड गाडुन जड वाहतुक बंद केली. परंतु कांद्री ग्रा प पदाधिकारी व ट्रान्सपोर्टर माल कांनी जेसीबी च्या मदतीने ते गाढलेले सिंमेटचे दगड बाहेर काढुन जड वाहतुक सुरू केली. त्यानंतर कन्हान पोलीस स्टेशन ला जाऊन पोलीस निरिक्षकाना ग्रा प कांद्री सरपंच बळवंत पडोळे, उपसरपंच श्याम कुमार बर्वे हयानी कांद्री ला जाण्याचा रस्ता बंद करण्या-या कन्हान नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांचे विरू ध्द गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देऊन मागणी केली आहे.

नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांचे वर गुन्हा दाखल करा

गुरूवार (दि.२०) जानेवारी ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान कांद्री गावाकडे जाणाऱ्या पी डब्लु डी चा रस्ता नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांनी जेसीबी च्या मदतीने बंद करण्यात आला. नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांना कुठल्याही प्रकारचा अधि कार नसतांना सुद्धा जाणुन कांद्री जाणा-याचा रस्यांवर जेसीबी च्या मदतीने गड्ढे खोदुन सिमेंटचे मोठे दगड गाडुन रस्ता बंद केला. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन व सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असुन त्याच रस्त्यावर समोर उडान पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुक खोळबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याने स्थानिय ट्रान्सपोर्टर मालकांनी कांद्री ग्राम पंचायत सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे व काॅंग्रेस कमेटी जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांचाशी चर्चा करून निवेदन देत नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – नगराध्यक्षा आष्टणकर

कन्हान नदीवरील १५० वर्षा हुन जुन्या पुला वरून शासनाचा निर्बंध असुन सुध्दा ओव्हर लोड ट्रकांची जड वाहतुक सुरू असुन कुणाचेही या गंभीर समस्ये कडे लक्ष नसल्याने या जड वाहतुकीने ब्रिटीश कालीन जिर्ण पुलास धोका होऊन मोठी दुर्घटना हो ण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कन्हान नदी पुलावरून ट्रकने कोळसा, रेती, गिट्टी व इतर जड वाह तुक त्वरित बंद करण्यात यावी. तसेच कन्हान च्या नागरिकांनी आंदोलन करून नगरपरिषदेला पत्र देऊन कन्हान गहुहिवरा रस्त्यावरून कोळसा, रेतीची जड वाहतुक बंद करण्याची मागणी केल्याने नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन आमदार साहेबांचा नेतृत्वात जड वाहतुक बंद करण्यात आली. तरी सुद्धा गुरूवार (दि.२०) सायंकाळी ट्रान्सपोर्टर आणि काही नेत्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी राजकारणाचा फायदा घेत तारसा रोड ते गहुहिवरा रस्त्यावरून १० ते २० चाकी ट्रक ओव्हर लोड रेती व कोळसा लादून जड वाहतुक करण्यारे ट्रान्सपोर्टर हे टोल नाका वाचवुन शासनाची कर चोरी करण्यास कन्हान गहुहिवरा रस्त्या वरून जड वाहतुक करित नागरिकांच्या जीवाशी खेळ करणा-या ट्रान्सपोर्टर यांनी रस्त्यावरील सिमेंट दगड जेसीबी च्या मदतीने काढून पुन्हा जड वाहतुक सुरू केली. यामुळे गहुहिवरा चौकातील सीसीटिव्ही कॅमेरा फुटेज काढुन ट्रक मालकावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर हयानी कन्हान पोलीस निरिक्षकास तक्रारी चे निवेदन देऊन केली आहे.

कन्हान नदीपुल व शहरातुन जड वाहतुक बंद करा.
कन्हान नदीवरील जिर्ण पुलाची कालमर्या सपुन सुध्दा नविन पुलाचे काम कासव गतीने सुरू असल्या ने कन्हान नदी पुलावरून कोळसा, रेती, गिट्टी, विटा व इतर जड वाहतुक जोमाने सुरू असुन रेल्वे फाटक दर २५ मिनिटानी बंद होत असल्याने वाहतुकीचा खोंळबा होऊन दुर पर्यंत व पुलावर वाहनाच्या रांगा लागने नित्याचे झाल्याने पुलावर कधीही मोठी दुर्घटना होण्या ची शक्यता नाकरता येत नाही. तसेच कन्हान ते तार सा रोड वरील रेल्वे लाईन वर उडाण पुलाचे बांधकाम मंद गतीने सुरू असल्याने या रस्त्याची वाहतुक गोवारी शहीद चौकातुन कन्हान गहुहिवरा रस्त्यानी वळविण्या त आली आहे. बॉयपास चारपदरी महामार्गावर कांद्री टोल नाका असल्याने टोल नाका वाचविण्या करिता टॉन्सपोर्टर कन्हान गहुहिवरा चाचेर रस्त्यावरून मोठया प्रमाणात जड वाहतुक करित असल्याने राजकीय वर्चस्वाकरिता कन्हान नगरपरिषद व कांद्री ग्राम पंचायत चे पदाधिकारी व राजकीय मंडळी मध्ये कलंगीतुर्रा चांगलाच जमला आहे.
नागरिकांच्या महत्वाच्या रस्ता सुरक्षेते च्या दुष्टीने मा. जिल्हाधिकारी महोदया, नी त्वरित लक्ष केंद्रीत करून कन्हान नदी जिर्ण पुलावरून व कन्हान शहरा तुन होणा-या जड वाहतुकीवर प्रतिबंध लावुन जड वाहतुक त्वरित बंद करण्यांत यावी. तसेच कन्हान-कांद्री शहरा लगत असलेला नागपुर शहर बॉयपास चारपदरी महामार्गावरील कांद्री टोल नाका स्थानिक टान्सपोर्टच्या वाहनाना कर मुक्त करण्यात यावा. जेणे करून संपुर्ण जड वाहतुक बॉयपास महामार्गाने होऊन कन्हान-कांद्रीची जटील समस्या सुटुन नागरिक मोकळा श्वास घेतील अशी सर्वसामान्य नागरिकांत चर्चा रंगत चर्चेला उधाण येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खेडी- येसंबा मार्गाचे भुमिपुजन कार्यक्रम थाटात ;१७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन

Mon Jan 24 , 2022
*खेडी- येसंबा मार्गाचे भुमिपुजन कार्यक्रम थाटात *१७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन कन्हान – जिल्हा परिषद नागपुर व येसंबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खेडी ते येसंबा पोचरस्ता डांबरीकरण १७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन कार्यक्रम कैलास बरबटे यांच्या हस्ते पार पाडले. जिल्हा परिषद नागपुर व येसंबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खेडी मार्ग ते येसंबा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta