पिपरी-कन्हान शेत शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात जर्शी गाय ठार : सहा पाळीव जनावराची शिकार तरी रामटेक वन विभाग शांत

पिपरी-कन्हान शेत शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात जर्शी गाय ठार

#) बिबटयाचा धुमाकुळ, चार घटनेत ६ प्राळीव जनावरांची शिकार करून ठार केले.

कन्हान : – पारशिवनी तालुकातील पिपरी-कन्हान शेत शिवारात संदीप ठाकरे च्या शेतात बाधलेली कारवड जर्शी गाय वर एका बिबटयाने हल्ला करून गुरूवारी पहाटे सकाळी शिकार करून जर्शी गाय ला ठार केल्याने बिबटयाने धुमाकुळ घालीत ही चौथी शिकार केल्याने पुन्हा पिपरी, गाडेघाट, जुनिकामठी, घाटरोहना, गोंडेगाव, टेकाडी, वराडा, वाघोली, एंसबा, नांदगाव, बखारी या कन्हान व पेंच नदी काठालगत असलेल्या गावक-यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामटेक वन क्षेत्र अंतर्गत पारशिवनी तालुक्या तील पिपरी-कन्हान शेत शिवारातील रानी बागीचा जवळ गुरूवार (दि.५) जानेवारी ला सायंकाळी शेतकरी संदीप ठाकरे हे आपल्या शेतात प्राळीव जनावरे बांधुन घरी आले. दुस-या दिवसी जर्शी गाय दिसली नाही. शुक्रवार (दि.७) जानेवारी ला शेतात गेल्यावर काही अंतरावर जर्शी गायी चा फडशा पाडलेला दिसल्याने पशुपालक संदीप ठाकरे यांनी पत्रकार व गावक-यांच्या यांचे सहाय्याने वन विभाग पटगोवारी चे वनरक्षक श्री एस जी टेकाम यांना घटनेची माहीती भ्रमणधवनी ने दिली. तात्काळ वनरक्षकानी आपले वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्र सहायक द्विग्रेसे साहेव यांना दिल्यावर वनक्षेत्र सहायक अधिकारी श्री ए सी दिग्रसे स्वतः व वनरक्षक एस जे टेकाम यांना घटनास्थळी पोहचुन निरिक्षण करून पंचाच्या सहाय्याने पंचनामा करून शवाविच्छादन पंचायत समिती पारशिवनी चे वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल वनविभागाचे वनश्रेत्र सहायक अधिकारी ए सी दिग्रेस व वनरक्षक एस जी टेकाम याना दिला.
कन्हान व पेंच नदी काठालगत च्या गावच्या शेत शिवारात बिबट धुमाकुळ घालीत आतापर्यंत बखारी, गाडेघाट, वराडा व पिपरी येथील शेत शिवारात चार घटनेत ६ प्राळीव जनावरांची शिकार केल्याने परिसरातील गावकरी व शेतक-यात चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाल्याने वन विभागाने लवकरात लवकर या बिबटयाला पकडण्यात यावे. तसेच पिडीत पशुपालक संदीप ठाकरे यांची जर्शी गाय बिबटयाने शिकार करून ठार केल्याने झालेले २४ हजार रूपया ची नुकसान भरपाई वन विभागाने त्वरित देण्यात यावी अशी मागणी ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे व पिपरी-कन्हान आणि परिसरातील शेतकरी, नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

युवकाने शेतातील पेरूच्या झाडा गळफास लावुन केली आत्महत्या

Sat Jan 8 , 2022
युवकाने शेतातील पेरूच्या झाडा गळफास लावुन केली आत्महत्या कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा गोडेगांव शिवारात गजराज कश्यप यांच्या शेतात पेरू च्या बगिच्यात जाऊन पेरू (जांबाच्या) झाडाच्या फांदीला दुपटयाच्या साहाय्याने गळफास घेऊन स्वत: ची जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली. अरविंद अदालत निषांद असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta