कन्हान नदी पुलावर चारचाकी वाहनाची दुचाकी ला धडक, दोन युवक जख्मी

कन्हान नदी पुलावर चारचाकी वाहनाची दुचाकी ला धडक, दोन युवक जख्मी

कन्हान : – दुचाकी वाहनाने डब्बल सीट कामठीकडे जाणा-या दुचाकी ला समोरून येणा-या चारचाकी कार वाहनाने धडक मारून झालेल्या अपघातात दुचाकी चालक व मागे स्वार गंभीर जख्मी झाल्याने नागपुर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असुन अज्ञात कार वाहन चालकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
प्राप्त माहीतीनुसार रविवार (दि.२७) फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता दरम्यान स्प्लेंडर प्लस दुचाकी वाहन क्र. एम एच ४० ए एच ४२६६ ने प्रदीप दिपक तायवाडे वय २६ वर्ष रा. विवेकानंदनगर कन्हान व मित्र आशिष ठाकुर राह कन्हान हे दोघेही डबल सीट कन्हान येथुन कामाने कामठी कडे जात असतांना कन्हान नदी पुलाच्या रस्त्यावर सामोरून येणा-या पांढ-या रंगाच्या चार चाकी कार च्या अज्ञात वाहन चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काजीपणे चालवित आणुन दुचाकी ला सामोरून धडक मारून अपघात केला. यात दोघेही गंभीर जख्मी झाल्याने कामठी वरून शासकीय रूग्णालय नागपुर येथे उपचार्थ दाखल करण्यात आले असुन दुचाकीचे सुध्दा नुकसान झाले. जख्मी फिर्यादी प्रदीप तायवाडे यांचे तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीसानी अज्ञात कार चालका विरूध्द कलम २७९, ३३७, ३३८ भादंवि सहकलम १८४, १३४, १७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोहवा गणेश पाल हे करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महाविद्यालयीन कर्मचाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न ; दोघांना अटक

Thu Mar 3 , 2022
महाविद्यालयीन कर्मचाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न मानेवर आणि पोटावर प्राणघातक शस्त्राने वार , दोघांना अटक सावनेर : डॉ. हरिभाऊ आदमणे कला व वाणिज्य महाविद्यालयातील कर्मचारी प्रकाश घ्यार (५२) प्रोफ़ेसर काॅलनी सावनेर यांच्यावर मंगळवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यात आला. सावनेर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]

You May Like

Archives

Categories

Meta