महाविद्यालयीन कर्मचाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न
मानेवर आणि पोटावर प्राणघातक शस्त्राने वार , दोघांना अटक
सावनेर : डॉ. हरिभाऊ आदमणे कला व वाणिज्य महाविद्यालयातील कर्मचारी प्रकाश घ्यार (५२) प्रोफ़ेसर काॅलनी सावनेर यांच्यावर मंगळवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यात आला. सावनेर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बबलू (कृष्णा) जगदिश तिवारी (२५) रा. महानज ले आऊट आणि शिवप्रताप राव (३३) रा. भगत ले आऊट हे बाजार चौकात एका बार समोर मुख्य रस्त्यावर लघुशंका करित असता घ्यार यांनी हटकले या कारणा वरुन आरोपींनी घ्यार यांच्या वर प्राणघातक शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी प्रकाश घ्यार यांच्या मानेवर व पोटावर चार ठिकाणी वार केले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असुन पुढील तपास सावनेर पोलिस निरीक्षक मारोती मुळक त्यांच्या मार्गदर्शनात करीत आहे .
