दणका युवा संघटनाचे योगेश वाडीभस्मे व किरण ठाकुर हयानी दिला माणुसकीचा परिचय

गुजरात येथुन भटकलेल्या अनोळखी इसमाच्या नातेवाईकाशी संपर्क करून दिला

#) दणका युवा संघटनाचे योगेश वाडीभस्मे व किरण ठाकुर हयानी दिला माणुसकीचा परिचय.

कन्हान : – गुजरात येथुन तीन महिन्या पुर्वी घरून निघालेला एक अनोळखी इसम आढळुन आल्याने दणका युवा संघटनाचे योगेश वाडीभस्मे व किरण ठाकुर यांनी पुढाकार घेत त्याच्या नातेवाईकांशी फोन वर संपर्क करून तो गिरीश चंदु नावाचा इसम गुजरात चा असल्याचे कळल्याने त्याचे नातेवाईक घ्यायला येई पर्यंत पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्याशी चर्चा करून त्या इसमास कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधि न करून माणुसकीचा परिचय दिला आहे.
दोन ते तीन दिवसापासुन एक अनोळखी इसम हा ठाकुर सावजी भोजनालय & धाबा नागपुर जबलपुर महामार्ग टोल नाका कांद्री परिसरात फिरतांनी आढळ ल्याने ढाबा संचालक द़णका युवा संघटना चे किरण ठाकुर व योगेश वाडीभस्मे यांनी पुढाकार घेऊन त्यांचा शी बोलण्याचा प्रत्यन केला. त्यांची भाषा समजत नस ल्याने त्यांला जेवन दिले. असता त्यांच्या वागण्यावरुन किरण ठाकुर, योगेश वाडीभस्मे यांचे लक्षात आले की, तो भटकलेला असल्याने त्यांची सखोल चौकशी केल्यावर त्याने घातलेल्या टी शर्ट वर गुजरात मधील एका दुकानाचे नाव व मोबाइल नंबर दिसल्याने ढाबा संचालक किरण ठाकुर यांनी त्या नंबर वर फोन केला असता तो फोन एका व्यापारीचा असल्याने किरण ठाकुर यांनी त्यास अनोळखी इसमाचा फोटो पाठवि ला. व्यापा-याने तिकडे शोध घेऊन किरण ठाकुर यांना कळविले की, तो अनोळखी इसम आमच्या गावचा गिरीश चंदु असुन तीन महिण्यापासुन घरून निघुन गेलेला आहे. किरण ठाकुर व योगेश वाडीभस्मे यांनी त्या इसमाचा परिवाराशी संपर्क केला. असता त्यानी म्हटले की, आम्ही गुजरात वरून गाडीने येत असुन त्यास आम्ही परत घरी घेऊन जाण्यासाठी निघाले आहो. तेव्हा दणका युवा संघटना पदाधिकारी योगेश वाडीभस्मे आणि किरण ठाकुर यांनी त्याच्या सुरक्षेच्या दुष्ट्रीने कन्हान पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेऊन चर्चा करून त्या अनोळखी इसमास त्याच्या योग्य नातेवाईकाच्या सुर्पुद करण्या करिता अनोळखी इसम गिरीश चंदु ला कन्हान पोली स स्टेशन च्या स्वाधिन करून किरण ठाकुर व योगेश वाडीभस्मे हयानी माणुसकी जपत अनोळखी इसमास त्याच्या परिवाराशी संपर्क करून देत पुढे येऊन मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मोहदी धरण बनविल्यास ड्राय झोन नरखेड भागा च्या शेती सिंचन व पाण्याचा प्रश्न सुटणार- मा. प्रकाश जाधव

Wed Jun 1 , 2022
मोहदी धरण बनविल्यास ड्राय झोन नरखेड भागा च्या शेती सिंचन व पाण्याचा प्रश्न सुटणार- जाधव #) महाराष्ट्राच्या कमी खर्च धरणाने मध्यप्रदेश च्या गावातील पिण्याचा पाण्याची समस्या संपणार.  कन्हान : – नागपुर जिल्हयातील नरखेड तालुक्यातील ड्राय झोन परिसरातील मध्यप्रदेश सिमे जवळ महाराष्ट्रातील मोहदी दळवी (हेटी) नाला येथे नविन धरण बवविण्याकरिता शेतक-यांच्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta