शेतात असलेल्या विस हजारांच्या साहित्याची चोरी

 

शेतात असलेल्या विस हजारांच्या साहित्याची चोरी

कन्हान,ता.03 सप्टेंबर

      कन्हान शहराचा हद्दीत असलेला बोरडा टोल नाक्या बाजुचा शेतातील खोली मध्ये अज्ञात युवकांनी एकुण विस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

    ही घटना रविवार (ता.28) ऑगस्ट सांयकाळी पाच वाजता ते सोमवार (ता.29) ला दुपारी अकरा वाजताच्या सुमारास घडली. उमेश विठ्ठलराव कावळे (६२) रा.खरबी, नागपुर यांची बोरडा टोल नाका कॅनलला लागुन पावणे पाच एकड शेतात धान पिक घेतलेले आहे. त्यामुळे शेतात सामान ठेवण्याकरीता खोली बनवलेली होती. याकरीता आठवड्यातुन दोन-तीन दिवस यायचे. रविवार (दि.२८) रोजी उमेश कावळे हे शेतामध्ये आले असता त्यांना शेतामध्ये खुल्या जागेत असलेली खोली उघडी दिसली व आत प्रवेश करून पाहणी केली असता खोली मध्ये असलेली ५ एच.पी. हाऊस पावर मशीन किंमत १४,००० रु, ४ खताची बॅग किंमत ५,४०० रु, व दोन प्लाॅस्टिक चेअर किंमत ६०० रु. असा एकुण २०,००० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात युवकांनी चोरून नेल्याने पोलीसांनी उमेश कावळे यांच्या तक्रारी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलें राज्य शिक्षक पुरस्कार असे नाव 

Sun Sep 4 , 2022
  शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलें राज्य शिक्षक पुरस्कार असे नाव कन्हान,ता.03 सप्टेंबर      राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीवकाम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. परंतु सदर पुरस्काराला आज पर्यंत कोणतेही नाव नव्हते डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने मागील पाच वर्षा पासुन राज्य शासनाच्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta