कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन व म.न.पा.यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक वितरण आयुक्तांच्या हस्ते  “इको-गणेश 2022” पारितोषिक वितरण

कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन व म.न.पा.यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक वितरण

आयुक्तांच्या हस्ते  “इको-गणेश 2022” पारितोषिक वितरण

नागपूर, ता.10 ऑक्टोबर

   नागपुर मधील प्रतिभावान रहिवासियांना वाव मिळावा व पर्यावरण जनजागृति व्हावी त्यासाठी कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन आणि नागपूर महानगर पालिका यांच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या “इको-गणेशा २०२२” च बक्षीस वितरण कार्यक्रम गुरुवारी ता. 2 ऑक्टोम्बर 22 महाल, नागपुर येथील म.न.पा. च्या सभागृहात संपन्न झाला.

16 वर्षाच्या सुदृढ बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्पर्धकांनी ही स्पर्धा गाजवली. ३१ ऑगस्ट ते ०९ सप्टेंबर दरम्यान जल्लोषात झालेल्या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व विजेत्या स्पर्धाकांच प्रशास्तिपत्र व तुळस देऊन त्यांचा सन्मान केला. कल्पवृक्ष टीमचे या यशस्वी आयोजनाबद्दल विशेष कौतुक केले आणि हा जल्लोष प्रत्येक वर्षी असाच उत्साहवर्धक होवो अशी अशा व्यक्त केली. स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्री. शशांक चौरसिया, द्वितीय पारितोषिक कु.हेमा हेड़ाऊ तर तृतीय पारितोषिक स्वप्निल चौरागडे यांना मिळाल. श्री.घनश्याम केसलकर यांना खास विजेते म्हणून घोषित करण्यात आले. मा.उपयुक्त श्री.गजेंद्र महल्ले यांची ‘इको-गणेशा’च्या यशस्वी घोडदौडीमध्ये विशेष भूमिका बजावली. त्यामुळे त्यांचेही विशेष अभिनंदन केले. सर्व प्रकारे सहाय्य केलेल्या कल्पवृक्ष ट्री संस्थेच्या स्वयंसेवकांना विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. गणेशउत्सवा दरम्यान म.न.पाला मदत व पर्यावरण जनजागृति केल्या बद्दल कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन, लीडर क्लब, आय क्लीन नागपुर, रॉबिनहुड आर्मी, सेविंग ड्रीम, नागपुर प्लॉगर्स, हेल्प मी हेल्प यु, तेजस्विनी महिला मंच, अभिग्यान फाउंडेशन, मैट्रिक्स वॉरियर्स फाउंडेशन, रामदेवबाबा इंजीनियरिंग इनवायरमेंटल फोरम, स्टॉर्म ऑफ इंडिया, नयन बहुद्देश्यीय महिला विकास व तांत्रिक शिक्षण संस्था, देवता लाइफ फाउंडेशन, ग्रीन विजिल फाउंडेशन, सुराटेक्स पा.ली., अनादर अर्थलिंग स्टूडियो, 20 MAH बटालियन N.C.C. डॉ.आंबेडकर कॉलेजचे आभार मानून त्यांचा स्मरणचिन्ह देऊन सन्मान केला. कल्पवृक्ष ट्री फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुमित पडोळे, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त श्री.दीपक मीना व श्री.राम जोशी, के ब्रैंड अम्बेसडर श्री.कौस्तुभ चटर्जी (ग्रीन विजिल फाउंडेशन), श्री.आर.जे. राजन, श्री. गुरदास राउत (क्रिकेटपटु, कैप्टेन), श्री.उमेश चित्रिव (होम कम्पोस्टिंग), श्रीमती.किरण मुंद्रा (तेजस्विनी महिला मंच),आंबेडकर कॉलेजचे उपायुक्त श्री. रविंद्र भेलावे या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कल्पवृक्ष ट्री संस्थेचे स्वयंसेवक कु. हर्षा रंभाळे आणि कु.अंकित इजगिरवार यांनी सूत्रसंचालन केले तसेच सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बस-कार अपघातात एकाचा मुत्यु , तर  6 गंभीर जख्मी

Sat Nov 5 , 2022
बस-कार अपघातात एकाचा मुत्यु , तर  6 गंभीर जख्मी  सावनेर : सावनेर तहसिल केलवद पोलिस स्टेशन अंतर्गत एसटी बस व स्विफ्ट कार च्या आमोरासामोर टक्कर झाल्याने एका युवकाचा घटनास्थळावरच मृत्यु तर गंभीर जखमीना उपचार हेतु ग्रामीण स्वास्थ्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर आणण्यात आले.  प्राप्त झालेल्या माहितीनुसार सावनेर छिंदवाडा मुख्यमार्गवर केलवद थाना […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta