कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन नागरिकांना यासारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

नागरिकांना यासारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

कन्हान,ता.23 सप्टेंबर

   जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे शुक्रवारी (ता.२३) सकाळी दहा ते पाच वाजता पर्यंत विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

 

   या शिबिराचे उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पंचायत समिती सभापती सौ.मिना कावळे, सरपंच बलवंत पडोळे, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, उपसभापती चेतन देशमुख, उपसरपंच श्यामकुमार बर्वे उपस्थित होते.

    नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधारकार्ड, राशन कार्ड, मतदानकार्डे व मतदान नोंदणी या प्रकार ची कामे पूर्ण करण्यात प्राधान्य देण्यात आले. नागरिकांना यासारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल असा आशावाद सर्व प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन खिमेश बढिये यांनी तर प्रास्ताविक तहसिलदार प्रशांत सांगळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी वंदना सवंगपते, तहसीलदार प्रशांत सांगळे, गट विकास अधिकारी सुभाष जाधव, गटशिक्षणाधि कारी सौ.वंदना हटवार, नायब तहसीलदार  रणजित दुसावार, केंद्रप्रमुख लता मालोदे, बेंदले, सेतु केंद्र कन्हानचे शरद वाटकर, सतीश भसारकर, कांद्री-कन्हान शाळां मधील सर्व मुख्याध्यापक, कांद्री ग्राम पंचायतचे सचिव दिनकर इंगळे व ग्राम पंचायत कांद्री येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.कांद्री, कन्हान, खेडी, बोरी, निमखेडा, निलज, खंडाळा, वराडा, टेकाडी, घाटरोहणा, केरडी व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन नागरिकांना यासारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल - जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

Fri Sep 23 , 2022
कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन नागरिकांना यासारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर कन्हान,ता.23 सप्टेंबर     जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे शुक्रवारी (ता.२३) सकाळी दहा ते पाच वाजता पर्यंत विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.   या शिबिराचे उद्घाटन आमदार […]

You May Like

Archives

Categories

Meta