सरकारच्या विरोधात व्यथा मांडत कलाकारांचा अधिवेशनावर धडक मोर्चा हजारोंच्या संख्येत शाहीर कलाकार यांचा आक्रोश कलाकार यांच्या मागण्या लवकर पूर्ण करू – सुधीर मुनगंटीवार

सरकारच्या विरोधात व्यथा मांडत कलाकारांचा अधिवेशनावर धडक मोर्चा

हजारोंच्या संख्येत शाहीर कलाकार यांचा आक्रोश

कलाकार यांच्या मागण्या लवकर पूर्ण करू – सुधीर मुनगंटीवार

नागपूर :-
    कलाकार शाहीरांनी ढोलकीतून हुंकार देत हिवाळी अधिवेशन मध्ये डिसेंबर २०२३ ला मानधनात वाढ करावी अशी प्रमुख मागणीसाठी हजारोंच्या संख्येने “कोण आला रे,”कोण आला, महाराष्ट्रातून शाहिरांच्या बाप आला’ अशा घोषणा व विविध नारेबाजी करून शाहीर कलाकारांनी विधानभवनावर जोरदार धडक दिली.
    नारेबाजीच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी मोर्चात महाराष्ट्रतील कानाकोपऱ्यातून आलेल्या कलावंतांची पहाळी आवाजात पोवाडा, विविधरंगी वेशभूषा, नृत्य, ढोल, डफली वाजवून आणि घोषणाजी करून परिसर दणाणून सोडून लक्षवेधी ठरले.


    भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया व महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्या वतीने शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत हातात डफरी घेऊन शाहीर व राज्यभरातील हजारों कलाकार मोर्चात सहभागी होऊन सरकार विरोधात तीव्र रोष होता. सरकारकडून केवळ पोकळ आश्वासने देऊन मते घेतली जातात. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी यावेळी केला. मागण्या पूर्ण न केल्यास पुढे स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा, यावेळी देण्यात आला.
      वृद्ध कलावंतांच्या मानधनात दहा हजार ते बारा हजार रुपयां पर्यंत वाढ करावी, शेकडो प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता जिल्हा समितीमध्ये वर्षाला ५०० मानधन प्रकरणे घेण्यासाठी मजुरी द्यावी, शासनमान्य ओळखपत्र शिखर वार्षिक उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत करावी, वृद्ध कलावंतांना शासनाकडून सर्व आरोग्य सेवा मोफत मिळावी आणि यासाठी आधार कार्डप्रमाणे वेगळे संस्था सभासद कलावंतांना द्यावे, लोक कलावंत, शाहीर यांना राहत्या गावी घर बांधण्यास बँकेतर्फे संपूर्ण बिनव्याजी शासन शिफारसीने कर्ज द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या.

     यावेळी शाहीर राजेंद्र बावनकुळे, भगवान लांजेवार, अंबादास नागदेवे, योगिता नंदनवार, उत्तम गायकर नाशिक, गणेश देशमुख भंडारा पदाधिकान्यांच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. मंत्री महोदयांनी यांनी अ. ब. क श्रेणीनुसार कलावंतांना मानधन वाढ, विविध मागण्या व सरकारच्या योजनेअंतर्गत कलावंतांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रेल्वे ओव्हर ब्रीज नियम बाह्य असल्याने मनुष्य वधाचा गुन्हयाची मागणी

Wed Dec 20 , 2023
रेल्वे ओव्हर ब्रीज नियम बाह्य असल्याने मनुष्य वधाचा गुन्हयाची मागणी कन्हान, ता. १९ डिसेंबर      कन्हान तारसा रोड वरील रेल्वे ओव्हर ब्रीज नियम बाह्य बनलेला असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला असून जर‌ का? त्यामुळे जीवित हानी झाली तर संबंधित व्यक्तिन वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी‌ निवेदनातून केली […]

You May Like

Archives

Categories

Meta