कन्हान येथे तीन दिवसीय भीम महोत्सवचे आयोजन

कन्हान येथे तीन दिवसीय भीम महोत्सवचे आयोजन

 

कन्हान,ता.११ नोव्हेंबर

रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान च्या वतीने ११ ते १३ नोव्हेंबर पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भीम महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ११ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता भगवान गावंडे यांचे प्रबोधन व भीम गीतगायन, १२ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता अनिरुद्ध शेवाळे यांचे प्रबोधन व भीम गीत गायन १३ नोव्हेंबर ला सकाळी दहा वाजता सुमधुर संगीतमय आर्कष्टा कार्यक्रम तर सायंकाळी सहा वाजता संदीप पाल यांचे प्रबोधन व भीमगीत गायन सह अन्य कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान चे आयोजक चंद्रशेखर भिमटे सह त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भोई ढिवर व तत्सम समाज उपवर वधु-वर परिचय सोहळा

Fri Nov 11 , 2022
भोई ढिवर व तत्सम समाज उपवर वधु-वर परिचय सोहळा कन्हान,ता.११ नोव्हेंबर  भोई विद्यार्थी संघटना व भोई ढिवर समाज विद्यार्थी कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था च्या वतीने उपवर वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सेवानिवृत्त कर्मचारी मान्यवरांचा सत्कार सोहळा रविवार, दि.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री.गुरुदेव सेवाश्रम, आग्याराम देवी चौक, नागपूर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta