शहरातुन सुरू असलेली जड वाहतुक बंद करण्याची मागणी टोल वाचवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याला व जिवाला धोका जड वाहतुकिने धुळीचे साम्राज्य, अपघातास निमंत्रण

शहरातुन सुरू असलेली जड वाहतुक बंद करण्याची मागणी

टोल वाचवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याला व जिवाला धोका

जड वाहतुकिने धुळीचे साम्राज्य, अपघातास निमंत्रण

कन्हान,ता.२१ जानेवारी
    भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था व‌ नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषद प्रशासनाची भेट घेऊन या मार्गावर अवजड डंपर व लांबच लांब जड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली.


    राष्ट्रीय चारपदरी नागपुर बायपास महामार्ग सुरू झाल्यापासुन कन्हान शहरातील जड वाहतुकीस बंदी असुन सुध्दा बिनधास्त शहरातुन कोळसा, रेती, गिट्टी, राख, सल्फेट ची दहा चाकी ते वीस चाकी ट्रकने जड व ओव्हर लोड वाहतुक सुरू असल्याने शहरातील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
तारसा रोड वरील रेल्वे उडाण पुल सुरू झाल्यापासुन जड वाहतुकीत वाढ होऊन अपघात वाढुन मोठया अपघाताची दाट शक्यता वाढल्याने कन्हान शहरातुन जड वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी.

   अशी मागणी भुमिपुत्र बहु उद्देशिय संस्था कन्हान अध्यक्ष चिंटु वाकुडकर यांचे नेतुत्वात नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली आहे.
    नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र.४४ हा कन्हान शहरातुन जात असुन दोन्ही बाजुला भरगच्छ लोकवस्ती आहे. शहराच्या मधोमध असलेल्या तारसा रोड चौकातुन तारसा कडे जाणा-या रस्त्यावर रेल्वेने उडाणपुल मागील महिन्यात सुरू केल्याने जड वाहतुक वाढु लागली आहे. राष्ट्रीय चारपदरी नागपुर बायपास महामार्ग सुरू झाल्यापासुन कन्हान शहरातील जड वाहतुकीस बंदी असुन सुध्दा टोल नाका वाचविण्या करिता बिनधास्त शहरातुन कोळसा, रेती, गिट्टी, राख, सल्फेट च्या दहा चाकी ते वीस चाकी पर्यंतच्या ट्रकने वाहतुक सुरू असल्याने शहरातील रस्त्या वर धुळीचे साम्राज्य पसरत असुन जड वाहतुकीची वाढ होऊन अपघात वाढुन मोठया अपघाताची दाट शक्यता वाढु लागली आहे.


   कन्हान शहरात १२ शाळा, चार कनिष्ट महाविद्यालय असल्याने शाळा, कनिष्ट महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांची दिवसांनी आणि ग्रामिण गावातील विद्यार्थी व नागरिकांची चांगलीच वर्दळ असते. तारसा रोडचे व्यवस्थित काम पुर्ण झाले नसुन रेल्वे उडाण पुला सामोर आंनद नगर रस्ता, गहुहिवरा-चाचेर मार्ग, राधाकृष्ण नगर रस्ता, वाघधरे वाडी, तारसा कडे उडाण पुल, तुकाराम नगर रस्ता, रेल्वे माल धक्का रोड, पांधन रोड, तारसा रोड चौक कडे जाणारा अशा आठ रस्ते जोडणारा अष्ट चौक येथे तयार झाल्याने सुध्दा अपघातास निमंत्रण देत आहे. पायदळी व दुचाकी वाहन चालकास हा रस्ता ओलांडणे भंयकर त्रास दायक ठरत आहे. शहरात आठवडी व गुजरी बाजारा करिता स्थायी जागा नसल्याने महामार्ग, तारसा रोड, पांधन रोड वरच गुजरी व आठवडी बाजार भरत असल्याने नेहमी वाहतुक खोंळबत असते. या रस्त्या लगत रहिवासी, दुकानदार या जड वाहतुकीच्या धुळी प्रदुर्शनाने त्रस्त असुन आरोग्यावर दुष्य परिणाम होत विविध आजाराला बळी पडत आहे. अशा विविध समस्यांनी येथील नागरिक भंयकर त्रस्त असल्याने संबधित अधिकारी व विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार्यवाही करून कन्हान शहरातील जड वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी. अशी मागणी प्रितीलीपी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी रामटेक, तहसिलदार पारशिवनी, कन्हान-पिपरी नगरपरिषद मुख्याधिकारी राऊत, नगराध्यक्षा सौ.करूणा आष्टणकर, कन्हान वरिष्ठ पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात भुमिपुत्र बहुउद्देशि य संस्था कन्हान अध्यक्ष चिंटु वाकुडकर, उपाध्यक्ष समशेर पुरवेले, सचिव रजनिश मेश्राम, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, प्रशांत भोयर, पी.एम मानकर, सुर्यभान कुंभलकर, ऋृषी कोचे, संगित भारती सह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेरच्या ध्रुव पीसेची 14 वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड

Mon Jan 22 , 2024
सावनेरच्या ध्रुव पीसेची 14 वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड   सावनेर :  मैदाने असली नसली तरी प्रतिभावान खेळाडू निर्माण होतील असे नेहमीच बोलले जाते, मात्र आजच्या स्थितित  सावनेरमध्ये खेळासाठी एकही मैदान नसल्याने व  कुटुंब आणि त्याचे शहराचे नाव उंचावण्याच्या इच्छेने सावनेरच्या ध्रुव शक्तीकांता पिसे यांच्यात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा जागृत […]

You May Like

Archives

Categories

Meta