मतीमंद महिलेशी अतिप्रसंग, अश्लील कृत्य करणारा आरोपी अटक जागरूक नागरिकांनी आरोपीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन  

मतीमंद महिलेशी अतिप्रसंग, अश्लील कृत्य करणारा आरोपी अटक

जागरूक नागरिकांनी आरोपीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन

कन्हान,ता.२१ जुलै

    मोहल्यात घरी, एकटा राहणा-या नराधमाने गावात बेवारस फिरणा-या वेळसर महिलेला घरी आणुन तिच्या सोबत जबरदस्तीने अतिप्रसंग करून आपली भुक भागविण्याकरिता अश्लील कृत्य करणारा आरोपी अनिल हांडा यास मोहल्यातील जागरूक नागरिकांनी पोलिसांना रंगेहात पकडुन दिल्याने कन्हान पोलीसांनी आरोपीस अटक करून वेळसर महिलेस मनोरूग्नालय पागलखाना नागपुर येथे दाखल करून वेळसर महिलेला मदतीचा हात दिला.

     विवेकानंद, कन्हान येथील रहिवासी अनिल हांडा घरी एकटाच राहत असुन त्याची पत्नी मरण पावली व त्याला मुलबाळ नाही. अनिल हांडा कधी कधी त्याचा घरी, गावात फिरणा-या मतीमंद महिलेला घरी आणून तिच्या सोबत शारीरिक संबंध करत असायचा. एका वर्षापूर्वी त्याला मोहल्ल्यातील पुरूषोत्तम लांजेवार, बबन सावरकर, हरिश पोटभरे, नरेंद्र कुर्वेकर आदी लोकांनी एका वेळ सर महिले सोबत पकडले होते. परंतु मोहल्ल्यातील लोकांनी त्यास एक वेळा माफ करा ” असे म्हटल्याने, पोलिसांना तक्रार केली नव्हती.

    बुधवार (दि. १९) जुलै २०२३ चे सायंकाळी ८ वाजता सुमारास अनिल हांडा एका वेळसर महिला वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष जिने अंगात लाल, पिवळ्या रंगाचा कुर्ता व पायात आकाशी रंगाचा सलवार घातलेला‌ होता. डोक्यावर काळे पांढरे लहान केस मुला सारखे असलेल्या महिलेस घरी घेवुन जावुन तिचा सोबत जबरदस्तीने अतिप्रसंग करतांना मिळुन आला. आज सुद्धा वेळसर महिले सोबत अशेच घाणेरडे कृत्य करेल आणि मोहल्यात असे कृत्य नेहमी बरे नाही म्हणुन मोहल्ल्यातील किशोर बेलसरे, पुरूषोत्तम, हरिश पोटभरे, बबन सावरकर, जनार्धन बागडे, अरूण पोटभरे, गणेश मेश्राम,  नरेंद्र कुवेंकर व शकिला वाहिद शेख आदी एकत्र येत विचारविमर्स करून कन्हान पोलीसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचुन अनिल हांडाच्या घरी जावुन त्यास आवाज दिला. अनिल हांडा याने दार उघडले तेव्हा तो कमरेत दुपट्टा गुंडुन होता. नागरिक आणि पोलीस त्याचा रूम मध्ये गेले तर त्याचा बेडरूम मध्ये दिवाणावर सोबत घरी नेलेली वेळसर महिला झोपलेली दिसली. तिचा सलवार दिवानचे खाली पडलेला होता व ती अर्धनग्न अवस्थेत होती. सदर रूमची परिस्थिती पाहिल्यावर अनिल हांडा याने वेळसर महिले सोबत जबरी अतिप्रसंग केला असावा असे लक्षात आले. अनिल हांडा याने या वेळसर महिलेशी जिला बोलता व स्वत: चे नाव सुद्धा सांगता येत नाही. अशा वेळसर महिले सोबत जबरदस्तीने घाणेरडे कृत्य केल्याने कन्हान पोलीसानी फिर्यादी पुरूषोत्तम लांजेवार (वय ४०) रा. विवेकानंद नगर कन्हान यांचे तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला आरोपी अनिल हांडा यांचे विरूध्द  अप क्र ४६३/२०२३ कलम ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एल) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. वेळसर महिलेची वैद्यकिय तपासणी करून नागपुर येथील पागलखाना मनोरूग्नालयात दाखल करण्यात आले. कन्हान पोलिस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शाहीर प्रदिप कडबे यांच्या जाहीर सत्कार 

Sat Jul 22 , 2023
शाहीर प्रदिप कडबे यांच्या जाहीर सत्कार कन्हान,ता.२२ जुलै     लोकशाहीर वस्ताद स्व.भीमराव बावनकुळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरुवंदन सोहळा भव्य विदर्भस्तरीय शाहीर कलाकार मेळावा नुकताच कामठी येथील श्रीराम जानकी मंगल कार्यालयात पार पडला. भारतीय कलाकार शाहीर मंडळ व सर्वस्तरीय कलाकारांच्या करीता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये रामटेक तालुक्यातील किरणापूर […]

You May Like

Archives

Categories

Meta