निर्माणाधिन कन्हान नदीच्या पुलावर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

*निर्माणाधिन कन्हान नदीच्या पुलावर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या!*
*मृतदेहाच्या उजव्या हातावर MSअसे गोंदलेले*

कमल सिंह यादव*
पारशिवनी तालुका प्रतिनिधी

पारशिवनी/कन्हान*: ९ सप्टेंबर २०२०
नागपुर जिल्ह्यातील कन्हान नदी वर निर्माणाधीन असलेल्या पुलाला एका अज्ञात व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मुतदेह आढळला आहे.मृतदेह बुधवार सकाळी आढळला असून याबाबत कन्हान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन,मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.
सदर युवकाच्या उजव्या हातावर MS गोंदलेले असुन सदर इसमाची अद्याप ओळख पटली नाही. इसमाची आत्महत्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस तपासात काय पुढे येत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कन्हान पोलीस स्टेशन नजीकच कन्हान नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे.बुधवार सकाळी कन्हान पोलिसांना कंट्रोल रूम मधून अज्ञात इसमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत कन्हान नदीवरील नवीन पुलाला अडकून असल्याची माहिती मिळाली माहितीच्या आधारे कन्हान पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गळफास घेतलेली व्यक्ती अनोळखी असून,त्याची ओळख पटू शकलेली नाही.
“गळफास घेतलेली व्यक्ती ३५ ते ४० वयोगटाची असून,उजव्या हातावर M.S.अशे गोंदलेले आहे.
कुणीही सदर इसमाला ओळखत असल्यास पोलीस स्टेशन कन्हान येथे संपर्क साधण्याचे आव्हान कन्हान पोलिसांनी केले आहे.इसमाची आत्महत्या की हत्या हा पेच कायम आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस तपासात काय पुढे येत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

टिकले कुटुंबीयांचा आधार हरवला : आदर्श शिक्षक

Wed Sep 9 , 2020
*टिकले कुटूबीयाचा आधार हरवला…* *जिल्ह्यातील शिक्षकांमधून होत आहे हळहळ व्यक्त.. *परिवाराला देय असणारे सर्व शासकीय लाभ तातडीने देण्याची मागणी. कन्हान :- जि. प.प्राथमिक शाळा, ब्राम्हणी,पंचायत समिती उमरेड येथील कार्यरत शिक्षक कृष्णा गोविदराव टीकले स.शिक्षक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळे जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांनामधून हळहळ व्यक्त होत आहे. पंधरा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta