रणजितसिंह डिसले गुरूजी कोरोना पॉझिटव्ह

सोलापूर – तब्बल 7 कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे बुधवारी सकाळी कोरोना चाचणीत पॉझिटव्ह निघाले . त्यांनी ही माहिती स्वत – हून वाॅस्टअप स्टेटसवर पोस्ट केली आहे .

जाहिरातीसाठी 7020602961

दरम्यान , गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर डिसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता . गेल्या काही दिवसात राज्यपाल कोश्यारी , मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , मनसे अध्यक्ष राज ठाकरे , शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी अभिनंदन करताना त्यांच्याशी चर्चा केली होती . दरम्यान , ‘ आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या मंडळींनीही कोरोना टेस्टकरून घ्यावी कोणतीही रिस्क घेऊ नये ‘ , अशी विनंती डिसले यांनी प्रतिनिधींशी बोलताना केली आहे . मुंबईहून गावी आल्यानंतर त्यांना लक्षणे दिसून येत असल्याने डिसले गुरूजींनी घरातल्या सर्वांची कोरोना तपासणी केली त्यात ते स्वत : व त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले . बाकीच्या घरातील सर्व मंडळींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचेही सांगण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती : सावनेर

Thu Dec 10 , 2020
सावनेर : श्री. संत तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ,शासकीय व निमशासकीय तसेच सर्व कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. अश्याच प्रकारे सावनेर येथील संताजी सभागृह येथे तेली समाज पंच कमेटी चे माध्यमातून संताजी याच्या मूर्तीचे पूजन करून जयंती हरुल्लाहात […]

You May Like

Archives

Categories

Meta