खंडाळा येथे गुरुपुजेला शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार
कन्हान,ता.११ जुलै
कन्हान शहर परिसरातील खंडाळा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील (दि.९) जुलै रोजी गुरुपूजा व शाहीर कलाकार मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

गुरुपुजा कार्यक्रमाचे उद्घाटन व दिप प्रज्वलन माजी आमदार राजेंद्र मुळक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया यांनी भाषणात, सर्व शाहीर कलाकारांनी एक होऊन लढा देण्याचे आवाहन केले. तसेच शाहीर कलाकार यांचे मानधन सरकारने वाढविण्यात यावे यासाठी संघर्ष करून यावेळी मंडळाचे प्रमुख राजू मुंडले यांच्या हस्ते शाहीर राजेंद्र बावनकुळे ,मानधन समिती सदस्य यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केले.
युवा शाहीर सुरज नवघरे यांच्या विनंतीला मान देऊन गरजू विकलांग मुलगी मनसा मंगेश पाटील हिला या प्रसंगी व्हील चेअर देण्यात आली. यावेळी नवघरे यांनी राजेंद्र मुळक यांच्या समोर शाहीरांना मानधन समिती मध्ये योग्य आणि कलाकार व्यक्तीची निवड करण्यासाठी विनंती केल्याने त्यांनी अनुभवी आणि कलाकारांना न्याय मिळवून देईन अशांची मानधन समिती नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.

शाहीर ब्रम्हा नवघरे यांनी उपस्थित शाहीर कलाकारांना आणि मोठ्या संख्येने उपस्थित गांवकरी लोकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन हुकूमचंद ठाकरे, नरेश राऊत, सेवकराम नेवारे, राजू मुळंले ,विक्रम वांधरें, भूपेश बावनकुळे, गिरिधर बावणे, शलिक शेंडे आणि शाहीर कलाकार यांची उपस्थिती होती.
सुरज नवघरे युवा कलाकार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने कलाकार मेळाव्यात सहभागी झाले होते.
Post Views: 597
Sat Jul 15 , 2023
शिवसेना कन्हान व्दारे देवेंद्र फडणविस व बावनकुळे यांचा फोटोंच्या अपमान शिवसेना मा.खासदार जाधव यांच्या नेतुत्वात शिवसैनिकांनी जाळला फळणवीसांचा पुतळा कन्हान,ता.१४ जुलै शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा भाजप पारशिवनी तालुका व कन्हान शहर पदाधिका-यांनी अपमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना मा.खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतुत्वात शिवसैनिकांनी तारसा रोड चौक, […]