वर्गात गुरूजींचा फोटो लावण्यास शिक्षकांचा विरोध वादग्रस्त निर्णय मागे घेण्याची मागणी

 

वर्गात गुरूजींचा फोटो लावण्यास शिक्षकांचा विरोध

वादग्रस्त निर्णय मागे घेण्याची मागणी

नागपूर,ता.27 ऑगस्ट

         मा.सचिव शालेय शिक्षण विभाग व आयुक्त (शिक्षण) आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पूणे यांच्या दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी व्हिडीओ काँन्फरंस द्वारे दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी 25/08/2022 रोजी पत्र काढून ‘आपले गुरूजी’ या नावाने संबंधित शिक्षकाचा फोटो त्या त्या वर्गात सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. शिक्षक संघटनांशी चर्चा न करता शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात शिक्षकांमधून संताप व्यक्त केल्या जात आहे.
राज्यात आतापर्यंत कोणत्याच शासकीय कार्यालयात संबधित अधिकारी कर्मचारी याचा फोटो लावण्याचे ऐकीवात नसतांना केवळ शिक्षकांचा सन्मान करण्याच्या नावाखाली ज्या ठीकाणी थोर राष्ट्रीय पुरूषांचे, स्वातंत्र्य सेनानी व समाजसुधारकांचे फोटो लावण्याची गरज असतांना शिक्षकांनी स्वतःचे फोटो लावण्याच्या या निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध असून हा वादग्रस्त निर्णय मागे घेण्याबाबत चे निवेदन  जिल्हाधिकारी नागपूर यांचे मार्फत शासनाला देण्यात येणार आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे, मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रविण मेश्राम, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे प्रमोद लोन्हारे, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे लिलाधर सोनवणे,मनसे शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे शरद भांडारकर, अपंग कर्मचारी संघटनेचे विलास भोतमांगे,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे उमाकांत अंजनकर, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे मुरलीधर काळमेघ यांनी निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहरात तान्हा पोळ्याला मारबतीचे दहन मिरवणूक थाटात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर घेऊन जा sss गे मारबत.... मानवाधिकार संरक्षण संघटना द्वारे आयोजन

Sun Aug 28 , 2022
  कन्हान शहरात तान्हा पोळ्याला मारबतीचे दहन मिरवणूक थाटात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर घेऊन जा sss गे मारबत…. मानवाधिकार संरक्षण संघटना द्वारे आयोजन   कन्हान,ता.27 ऑगस्ट       कन्हान शहरात मानवाधिकार संरक्षण संघटना द्वारे तान्हा पोळ्याला समाजातील वाईट पंरपरा, कुप्रथा, भष्टाचार, शेजारी देशाच्या कुरापती, आंतकवाद यांचा निषेध […]

You May Like

Archives

Categories

Meta