माऊजर,जिवंत कारतुस सह एक आरोपी अटक ;पारशिवनी पोलिसांची कार्यवाही

पालोरा येथे गुप्त माहिती वरुन पारशिवनी पोलीस चे पथकाने माऊजर,जिवंत कारतुस सह एक आरोपी अटक.पारशिवनी पोलिसांची कार्यवाही.

पारशिवानी 🙁 कमलसिंह यादव) :-तालुक्यातील पालोरा येथील एका घरातून स्थानिय पोलिसांनी एक माऊजर आणि ७ जिवंत काडतुस जप्त केली करून. पोलिसानी आरोपीं अंकित उर्फ बबल्या गणेश वाघमारे .वय २४वर्ष .राहणार चनकापुर कालोनी ,हल्ली मुकाम पालोरा येथे आपल्या आजी च्या घरुन अटक करण्यात आली आहे. पाराशिवनी पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिनांक २३अप्रैल शनिवार रात्रि ७ वाजता च्या दरम्यान पालोरा येथे आरोपी हा आपल्या आजी च्या घरी काही दिवस पुर्वी रहायला आला होता त्याया मुकामी मुकाम पालोरा येथे असल्याची गुप्त माहिती वरुन पाराशिवनी पोलिसांना मिळाली होती. .
पारशिवनी पोलिसांनी पालोरा येथील आरोपी च्या आजी याच्या घरी राहत असल्याने घराची झडती घेतली. त्याच्या घरातून आयात केलेला लोखंडी हैंड्मेड माऊजर किमत ५५ .०००हजार रूपये आणि ७.६५एम एम आकार चे ७ जिवतं काडतुस किमंत ७ .००० ह्जार रूपये असे एकुण ६२००० हजार रुपये चे माल जप्त करून आरोपी अंकित उर्फ बबल्या गणेश वाघमारे . वय २४वर्ष ,राहणार चनकापुर ,ह्ल्ली मुकाम पोलोरा येथे आजी च्या घरुन अटक करण्यात आली.
आरोपी विरूध पोलिसाचा सरकारी तक्रारी वरुन पारशिवनी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १४४/२२ गुन्हा दाखल करून आरोपी अंकीत उर्फ बबल्या वाघमारे विरूध कलम ३/२५ आर्मस एक्ट ,१०९भादवी, १३५ म पो का आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस निरिक्षक राहुल सोनवने. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक दिलिप पोटभरे, पोलिस उपनिरिक्षक दिलिप बासोडे ,पोलीस हवलदार संदिप कडु, पो.हवलदार .मुद्दस्सर जमाल ,पो.हवलदार.जयंत शेरेकर,पो.ना.अमित यादव या पोलिस पथकाने यशस्वी कार्यवाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र ग्रामीण निंबधक कार्यालयात :- माजी खासदार प्रकाश जाधव *एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना लोकांच्या हितासाठी की त्रास देण्यासाठी

Sun Apr 24 , 2022
*भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र ग्रामीण निंबधक कार्यालयात :- माजी खासदार प्रकाश जाधव *एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना लोकांच्या हितासाठी की त्रास देण्यासाठी कन्हान, 22 एप्रिल जिल्ह्यातील ग्रामीण भागाची प्रगती व्हावी याकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय नागपुरात आहे. याच कार्यालयात ग्रामीण भागातील लोकांना भाग […]

You May Like

Archives

Categories

Meta