तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्या

तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्या. मनसे तालुकाध्यक्ष रोशन फुलझेले ची निवेदनाने मागणी.

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी

पाराशिवनी(ता प्र) : – महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे मा. हेमंतभाऊ गडकरी प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनात पारशिवनी तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांनी पारशिवनीचे तहसिलदार वरुणकुमार सहारे यांना निवेदन देऊन तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पेंच व तोतलाडोह धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने पेंच व कन्हान नदिला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावर वसलेले गांव पिपरी-कन्हान,सत्रापुर, सिहोरा, खंडाळा, निलज, बोरी, शिंगारदीप, गाडेघाट, जुनिकामठी, घाटरोहणा, डोरली, एंसबा, नांदगाव, बखारी, पिपळा, मेंहदी, नयाकुंड, पालोरा,माहुली, सालई,पाली ,उमरी,नेउरवाडा, आदी गावात पाणी शिरल्याने लोकांचे घरे बुडाल्याने बहुतेक घरे पडले. घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तु सुद्धा वाहुन गेले. तसेच परिसरातील शेतात पाणी शिरल्याने शेतातील तुर, पराठी, धान, सोयाबीन, भाजीपाला आदी शेतपिकांचे सुद्धा नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर बिकच संकट आले आहे. अश्या पुर ग्रस्त घरांचे व शेतीचे पंचनामे करुन शासनाकडुन तात्काळ नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष रोशन फुलझेले यांनी केली आहे. याप्रसंगी रामटेक तालुकाध्यक्ष शेखर भाऊ दुंडे, पारशिवनी तालुका उपाध्यक्ष नरेन्द्र पांडे, विक्की नांदुरकर, मंगेश कुंभारे, अतुल सरोदे, कमलेश नितनवरे, आनंद देशमुख आदीने उपस्थित होऊन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पुरग्रस्ताना शासनाने त्वरित मदत करावी : नगराध्यक्षा आष्टनकर

Mon Sep 7 , 2020
पुरग्रस्ताना शासनाने त्वरित मदत करावी. – नगराध्यक्षा आष्टनकर कन्हान : – पेंच व तोतलाडोह धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने कन्हान नदीला महा पुर येऊन नदीकाठाजवळील लोकांची घरे पाण्यात बुडुन नागरिकांच्या उदरनि र्वाहाच्या साहित्य व निवा-याचे मोठया प्र माणात नुकसान झाल्याने सरकारने तात डीने पुरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करावी असे नगराध्यक्षा करूणाताई आ ष्टनकर […]

You May Like

Archives

Categories

Meta