दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात

 

कन्हान,ता.२६

   नागपूर-जबलपूर महामार्गावरील तारसा रेल्वे ब्रिजवर दुचाकी चालक विरुद्ध दिशेने आल्याने मागच्या बाजूने येणाऱ्या टाटा दहा चाकी ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक जखमी झाला असून यात ट्रकचे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कंटेनर चालक अनिल दत् फौड (वय ३५) रा. सटनी, ता. हवेली, पुणे येथून पार्सल घेऊन वाराणसी (यु.पी) येथे निघाला होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास नागपूर-जबलपूर हायवे बायपास रोडने जात असताना तारसा रेल्वे पटरीच्या ब्रिजवर विरुद्ध दिशेने बजाज डिस्कव्हर दुचाकी चालक भरधाव वेगाने समोरून येताना दिसला. यावेळी अनिल दत्तु फौड आपल्या बाजूने ट्रक चालवत होता. अचानक ट्रक समोर आल्याने अनिल दत्तू फौड यांनी आपला ट्रक वळवला यात दुचाकी चालक ट्रकच्या बाजूला पडला. कंटेनर ट्रक चालक याने ब्रेक मारले असता मागून येणाऱ्या टाटा दहा चक्का ट्रकच्या चालकाने कंटेनर ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अनिल दत्तु फौड यांचा ट्रकचे मागील भागाचे नुकसान झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस हवालदार प्रवीण चव्हाण, महेंद्र जळीतकर घटनास्थळी पोचून पंचनामा केला. अपघातात दुचाकी वाहन चालक जखमी झाल्याने त्याला मेयो रुग्णालय नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शेतात साहित्याची चोरी करून घरफोडी

Fri May 26 , 2023
शेतात साहित्याची चोरी करून घरफोडी कन्हान, ता. २६ : नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वराडा बसस्थानक जवळील शेतात असलेल्या घरात घरफोडी करून शेत साहित्याची चोरी केली. गहू, डिझेल इंजिन, कॉम्प्रेसर, इलेक्ट्रीक पंप मोटार, ट्रॅक्टरचे क्लज प्लेट, प्रेशर प्लेट, पोकलैंड मशिन टोचन चैन असे ६१ हजार ९४० रुपयांच्या साहित्य चोरून नेले. आरोपी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta