एक दिवा वीर शहीदांच्या नावाचा

एक दिवा वीर शहीदांच्या नावाचा

कन्हान : – भाजप कन्हान शहर च्या वतीने दिवाळी सणा निमित्याने तारसा रोड शाहिद चौक येथे एक दिवा शहिदांचा नावाचा कार्यक्रमांतर्गत भाजपा कन्हान शहराच्या वतीने तारसा रोड शहीद चौक कन्हान येथे शहीद स्मारकावर पुष्प अर्पण व दिप प्रज्वलित करून वीर शहीदांना अभिवादन करण्यात आले . 

      रविवार दि.१५ ला सायंकाळी तारसा रोड शहीद चौक कन्हान येथे भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांच्या हस्ते शाहिद स्मारका वर पुष्पु ,  पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलित करून देशा करिता शहीद झालेल्या वीर जवान शहीदांची आठवण करून एक दिवा वीर शहीदांच्या नावाचा लावुन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषद विरोधी पक्ष गटनेते राजेंद्र शेंदरे, भाजपा परशिवनी तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, महामंत्री संजय रंगारी , कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर, अमोल साको रे, रिंकेश चावरे, माजी नगरसेवक अजय लोंढे, प्रसिद्धि प्रमुख ऋृषभ बावनकर, संजय चोपकर, सुरेश चावके, अमन घोडेस्वार, पप्पु चौधरी सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्तानी उपस्थित राहुन वीर शहीदाना विन्रम अभिवांदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची कांद्री ला जयंती साजरी

Tue Nov 17 , 2020
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची कांद्री ला जयंती साजरी कन्हान : – ग्राम पंचायत कांद्री येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना आदरांजली अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. जाहिराती करिता संपर्क 7020602961 ब्रिटिश जुलमीविरोधात रणशिंग फुकणारे क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांची जयंती रविवार दि.१५ नोव्हेंबर २०२०ला ग्राम पंचायत कार्यालय कांद्री येथे क्रांतीसुर्य  बिरसा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta