आपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार : मुख्याधिकारी अर्चना वंजारी

*आपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार* मु.अ.अर्चना वंजारी

*सातारा-सांगलीच्या मुलामुलींचे पथनाट्याद्वारे जनजागृती*

कमलासिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी


*पारशिवनी*(ता प):-
संपूर्ण विदर्भात पहिल्यांदाच नगरपंचायत पारशिवनी येथे स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 व *माझी वसुंधरा अभियाना* *बाबत वासुदेव फेरी*, पथनाट्य इत्यादी अभिनव कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे सुंदर तसेच कचरामुक्त शहर करण्यासाठी पारशिवनी नगर पंचायतर ची मुख्यआधिकारी अर्चना वंजारी के कटीवंध आहे,तसेच नगर पंचायत कार्यालयाने शहरातील नागरिकांना शहर कचरा मुक्त करण्याचे आवाहन करीत सातारा-सांगली येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून शहरात जनजागृती केली.


जनजागृती करीत असताना पारशिवनी शहरात कचरा होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे तसेच इतरत्र कचरा होणार नाही, ही शहरातील प्रत्येक नागरिकांच जबाबदारी आहे हे सांगली सातारा येथील पथनाट्य पथकातील मुलामुलींनी नाटीका सादर करून जनजागृती केली. तर शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही प्रशासन तसेच प्रत्येक नागरिकांची आहे, हे या पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण करून जनजागृती केली जात आहे. आपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार असून, स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबवले जाऊ शकते. असे आव्हान नगर पचां ची मुख्य अधिकारी अर्चना वंजारी यांनी शहरातील् नागरिकाना केले आहे, पथनाट्य पारशिवनी शहरातील अनेक प्रभागात तसेच शहरातील मुख्य ठिकाणी सादर करून जनजागृती केली. या पथनाट्याच्या सादरीकरणावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी अर्चना वंजारी, पो. नि.संतोष वैरागडे, नगराध्यक्ष ,उपाध्यक्ष माधुरी भिमटे,सागर सायरे सभापती, सभापती गुलनाज शेख, सभापती निकीता गौनाडे, नगरसेवक ओम पालीवाल, व इतर नगरसेवक-नगरसेविका तसेच कार्यालयीन कर्मचारी, नगरवासी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर 

Sun Dec 27 , 2020
श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर  कन्हान ता.26        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांची विनंती स्वीकारून, दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे आज दिनांक 26डिसेंबर रोजी शनिवारला रक्तदान शिबिर घेण्यात […]

You May Like

Archives

Categories

Meta