अपघातात इसमाचा घटनास्थळी मृत्यू ; सावनेर-सावंगी रोडवरील वीट भट्टा जवळील घटना

अपघातात इसमाचा घटनास्थळी मृत्यू .
सावंगी रोडवरील वीट भट्टा जवळील घटना


सावनेर तालुका प्रतिनिधी: घरी परत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने इसमाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 26 2 2023 ला रात्री 9 च्या दरम्यान माहितीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादाराव बापूराव जीवतोडे वय ५० राहणार तिष्टी (बु) हे आपल्या दुचाकी क्रमांक MH 40 Aj4539 ने सावनेर वरून सावंगी मार्गे आपल्या घरी परत जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांना जबर मार लागला. घटनेची माहिती समाजसेवक हितज्योती फाऊंडेशन चे  हितेश बनसोड यांना मिळतात त्यांनी पोलिसांसह घटनास्थळी पोहोचून दादाराव यांना सावनेर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत असल्याचे समोर आले. पुढील तपास सावनेरचे पोलीस निरीक्षक मारोती मुळूक करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सलामे कुंटूबाला ५ लाखाची सहायता व पत्नीस नोकरी द्यावी- माजी आ.रेड्डी मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडणवीस यांना निवेदनातून मागणी

Tue Feb 28 , 2023
सलामे कुंटूबाला ५ लाखाची सहायता व पत्नीस नोकरी द्यावी- माजी आ.रेड्डी मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडणवीस यांना निवेदनातून मागणी कन्हान,ता.२८ फेब्रुवारी      पोलीस विभागाने तपासाकरिता ताब्यात घेतलेल्या निर्दोष राहुल पंचम सलामे ची प्रकृती बिघडून उपचारा दरम्यान दगावला. आदिवासी राहुल सलामे च्या कुंटुबाला त्वरित मुख्यमंत्री सहायता निधीतुन ५ लाख रूपयाची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta