आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी *ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन थाटात साजरा

*आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी
*ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन थाटात साजरा

कन्हान : – आद्य “दर्पण ” मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमीत्य तेली समाज भवन संताजी नगर येथे (दि.६) जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजता ग्रामिण पत्रकार संघ कन्हान वतीने पत्रकार दिन थाटात पार पडला.


मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार व पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य  ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.रश्मीताई बर्वे अध्यक्षा नागपुर जिल्हा परिषद व प्रमुख अतिथि कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर, कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे , प्राथमिक आरोग्य केंन्द्र वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी, गुन्हे शाखेचे ठाणेदार यशवंत कदम, जेष्ठ पत्रकार मालवीय सर, अजय त्रिवेदी, धर्मराज शाळेचे नवनिर्वाचित मुख्यध्यापक खिमेश बढिये, शांताराम जळते सह आदीच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार ,माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात उपस्थित प्राथमिक आरोग्य केंन्द्र वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी , धर्मराज शाळेचे नवनिर्वाचित मुख्यध्यापक खिमेश बढिये , मुख्याध्यापक गणेश खोब्रागडे व मुख्याध्यापक पदावरून निवृत्त शांताराम जळते सर व सामाजिक कार्यकर्ता वामन देशमुख यांच्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन शाल , श्रीफल ,कैलेंडर व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना कैलेंडर व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांना व पत्रकार बांधवांना व नागरिकांना अल्पोहार वितिरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन गणेश खोब्रागडे व प्रस्थावना खिमेश बडीये यांनी केले तर आभार मोतीराम रहाटे यांनी मानले.

प्रतिनिधी

सुनिल सरोदे

कन्हान

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कल्याणी सरोदे ला राज्यस्तरीय युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार

Sun Jan 9 , 2022
*कल्याणी सरोदे ला राज्यस्तरीय युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार २०२१ *कल्याणी सरोदे गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान कन्हान-कांन्द्री रहिवाशी कल्याणी सरोदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार 2021 सन्मानित करण्यात आले. बेस्ट मेकअप आर्टिस्ट युथ इतक्या कमी वयामध्ये त्यांनी इंटरनॅशनल अवॉर्ड व नॅशनल अवॉर्ड पारितोषिक मध्ये प्रथम क्रमांक पटकावता […]

You May Like

Archives

Categories

Meta