कन्हान नगरपरिषद ला विशेष सभेचे आयोजन करणार – मा.आ.मल्लिकार्जुन रेड्डी

 

कन्हान नगरपरिषद ला विशेष सभेचे आयोजन करणार – मा.आ.मल्लिकार्जुन रेड्डी

 
लोकहितात सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन भूखंड विक्री रद्द करण्याची मागणी 
कन्हान,ता.२३ नोव्हेंबर

    कन्हान शहरातील हिंदुस्थान लिव्हर कंपनी लि.ची सुमारे 19 एकर जमीन खरेदी केल्यानंतर, फेरफार तसेच नगरपरिषदेची परवानगी न घेता जाहिरात‌बाजी करून भूखंड विकण्याचा व्यवसाय सुरू केल्याचा व सरकारी जागा उपलब्ध असून खाजगी जागे करता एमआयडीसी प्राधान्य का बरं देत आहे असा आरोप माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषद केला.

‌  सध्या कन्हान नगर शहरात हिंदुस्तान लिव्हर कंपनी यांच्या मालकीची भुखंडाची विक्री औद्योगिक कंपनीला न देता लेआउट धारक कंपनीला विक्री केल्याने कन्हान शहराचे राजकारण चांगलेच तापलेले असल्याने माजी आमदार मलिकार्जुन रेड्डी यांनी 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चरडे कार्यालय, तारसा रोड, कन्हान येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. पत्रकार परिषदेत बोलतांना रेड्डी यांनी सांगितले की, कन्हान शहरातील डीपी प्लॅन‌ मध्ये हिंदुस्तान लिव्हर कंपनीची अडीच एकर जमीन  नगरपरिषद साठी आरक्षण तरतूद केली होती. कन्हान डीपी प्लॅन मंत्रालय नगर विकास विभागाला मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. असं असताना देखील हिंदुस्तान लिव्हर कंपनीने लेआउट धारक कंपनीला पूर्ण भूखंडाची विक्री करण्यात आली. कंपनीने नगरपरिषद ची एनओसी न घेता गैरव्यवहार केल्याचे आरोप करत असताना नगरपरिषद ने विशेष सभाचे आयोजन करण्यात येऊन गावाच्या हितासाठी भूखंड विक्री झालेली रजिस्ट्री रद्द करून एखाद्या औद्योगिक कंपनी किंवा नगर परिषदेच्या सामुहिक विकासासाठी भूखंड आरक्षित करावी. असे पत्रपरिषदेत सांगितले, तसेच गेल्या चार वर्षाच्या कालावधीत नगरपरिषदेत, विधानसभेत, लोकसभेत एकाच पक्षातील सत्ता असलेले पुढारी व लोकप्रतिनिधी असून तरीदेखील कन्हान नगर परिषदेच्या आणि पारशीवनी तालुक्यात विकास प्रकल्प किंवा एखादी औद्योगिक कंपनी अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांची मोठी फौज तयार झालेल्यचे सांगितले. केंद्रीत मंत्री नितीन गडकरी यांच्या कडुन धडे घेत रामटेक क्षेत्रात कर्तव्य बजावला हवं. महाराष्ट्र राज्यातील खणीकर्म विभागाचं चार वर्षापासून अध्यक्ष पद भूषवुन सुद्धा रामटेक क्षेत्रात एकही उद्योग चालू करू शकले नाही अशा खनीकर्म अध्यक्ष पदाचा काय फायदा असल्याचे मल्लिकार्जुन रेड्डी यांनी नाव न घेता खडसावले. पारशीवनी तालुक्यात एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र घोगरा असून त्या ठिकाणी दोन ते तीन दवाई बनवणारी कंपनी सुरू आहे इतर उद्योगांना प्रोत्साहन उद्योग विभागाकडून मिळाला नाही. तसेच सरकारी महसूल विभागाची व महसूल नावांनी असलेली पडीत जागा कन्हान, सिहोरा, टेकाडी व कांद्रीला उपलब्ध असून खाजगी जागे करिता एमआयडीसी प्राधान्य का देत आहे. या विषयावर आमदार असताना 2019 मध्ये तहसीलदार पारशिवनी औद्योग विभागाला पत्रव्यवहार केला असल्याचे मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विक्री करण्याच्या कारवाईला बेकादेशीर असल्याचे  दर्शवून कन्हान- पिपरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी अवैध कामाला मंजुरी न देण्याचे आवाहन केले आहे‌ तसेच नगर परिषदेत विशेष सभा लावून मुद्द्यावर तटस्थ उभे राहण्याचे आवाहन नगरसेवकांना केले. यावेळी पत्रकार परिषदेत मलिकार्जुन रेड्डी, लीलाधर बर्वे, राजा शेंद्रे नगरसेवक, शालिनी बर्वे, चरडे मामा, रिंकेश चवरे, शैलेश शेळके, मोतीलाल हारोडे, अमोल साकोरे, मयुर माटे‌ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवसेना पक्षा द्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जाहीर निषेध

Thu Nov 24 , 2022
शिवसेना पक्षा द्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जाहीर निषेध राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदावरुन राजीनामा द्यावा कन्हान,ता.२३ नोव्हेंबर     महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वक्तव्याचा कन्हान शिवसेना पक्षा द्वारे आंबेडकर चौक येथे जाहिर निषेध करण्यात आला.    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती […]

You May Like

Archives

Categories

Meta