रेल्वे स्टेशन कन्हान येथे पोलिसांची मॉक ड्रिल भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास, पोलिसाची रंगित तालिम 

रेल्वे स्टेशन कन्हान येथे पोलिसांची मॉक ड्रिल

भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास, पोलिसाची रंगित तालिम 

कन्हान, ता. २४ जानेवारी 

   नागपुर ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन कन्हान येथे भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास सदर वेळची परिस्थीती योग्य प्रकारे हाताळण्यात यावी.

   या करिता रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर रूम मध्ये अनधिकृत प्रवेश करून स्टेशन मास्टर ला बंधक बनवुन घेतले आहे अशा माहिती वरून रंगीत तालिम (मॉक ड्रिल) घेण्यात आली.

      मंगळवार (दि.२३) ला ३.४५ वाजता पोलीस स्टेशन कन्हान हद्दीतील रेल्वे स्टेशन कन्हान येथे दोन बंदुकधारी अतिरेकी यांनी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर रूम मध्ये अनधिकृत प्रवेश करून स्टेशन मास्टर ला बंधक करून घेतले आहे.

    अशी माहिती मिळाल्याने लगेच पोलीस कंट्रोल रूम येथे तसेच वरिष्ठाना माहिती देवुन त्यांनी दिलेल्या निर्देशा प्रमाणे पोलीस स्टेशन कन्हान पोलीस तसेच पोलीस मुख्यालय ना ग्रा येथिल क्युआरटी व आरसीपी पथक, पोलीस स्टेशन खापर खेडा, मौदा, रामटेक, पारशिवनी, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, सुरक्षा शाखा, वाहतुक शाखा, बॉम्ब शोधक, नाशक पथक नाग्रा, एटीएस नागपुर यांना घटनास्थळी बोलावुन संयुक्तरित्या विशेष मोहिम राबवुन रेल्वे स्टेशन स्टेशन मास्टरचे रूम मध्ये अनाधिकृत प्रवेश करणारे अतिरेकी पैकी एकाला ठार करण्यात आले व एकाला जिवंत ताब्यात घेण्याची रंगित तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात आली.

   पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास सदर वेळची परिस्थीती योग्य प्रकारे हाताळण्यात यावे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर परिस्थती हाताळण्याचा अनुभव यावा म्हणुन पोलीस अधिक्षक आदेशाने सदर रंगीत तालिम घेण्यात आली.

   सदर मॉक ड्रिल पोलीस अधिक्षक हर्ष ए पोद्दार साहेब, अपर पोलीस अधिक्षक संदीप पखाल, पोलीस उपअधिक्षक (गृह) विजय माहुलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग पुंडलिक भटकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार कन्हान वपोनि सार्थक नेहेते, ठाणेदार पारशिवनी पोनि राहुल सोनवणे, सायबर पोनि राजेंद्र निकम, जिल्हा विशेष शाखा पोनि रविद्र मानकर, मुख्यालय रापोनि श्रीमती प्रतिभा भरोसे, सपोनि अमितकुमार आत्राम, फुलझेले, कर्मलवार, मलकुवार, पोउपनि सुरपान, सिमा बेदरे व इतर पोस्टे चे व शाखेचे एकुन ९० कर्मचा-यांनी यशस्विरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी कठोर मेहनत घ्या - खुशाल पाहुणे धर्मराज शैक्षणिक परिसरात विद्यार्थी उत्सवाचे (स्नेहसंमेलन)

Wed Jan 24 , 2024
व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी कठोर मेहनत घ्या – खुशाल पाहुणे धर्मराज शैक्षणिक परिसरात विद्यार्थी उत्सवाचे (स्नेहसंमेलन) कन्हान, ता.२४ जानेवारी      बालवयातच व्यक्तीमत्वाचे अंकुर फुलते त्यामुळे आपल्या मुलांचे चांगले व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी सुध्दा कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी उत्सवाचे अध्यक्ष खुशाल पाहुणे यांनी केले.     धर्मराज शैक्षणिक परिसरात विद्यार्थी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta