भाजपचे शंकरराव चंहादे ६ वर्षाकरिता निलंबित तर दोघांना कारण दाखवा नोटीस

भाजपचे शंकरराव चंहादे ६ वर्षाकरिता निलंबित तर दोघांना कारण दाखवा नोटीस

#) पक्षाच्या अधिकृत भुमिकेशी विसंगत वर्तणुकीने चंहादे निलंबित, हजारे, शेंदरे यांना नोटीस.  

कन्हान : –  नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला समर्थन दिल्यामुळे भाजपा पदाधिकारी चांगलेच अडचणीत आले असुन माजी नगराध्यक्ष व वर्तमान स्वीकृत सदस्य  शंकरराव चहांदे यांना भाजपने पक्षातुन सहा वर्षासाठी निलंबित केले आहे. तर तालुकाध्यक्ष अतुल हजारे व गटनेता राजेंद्र शेंदरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

          कन्हान नगर परिषदेचे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर एक मार्च २०२१ ला कन्हान नगर परिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. शिवसेना ३ नगरसेवक, १ नगराध्यक्षा असे ४, भाजप ६ नगरसेवक, असंतुष्ट कॉग्रेस २ नगरसेवकाच्या समर्थनाने शिवसेनेचे डॅनियल शेंडे १२ मताने निवडुन आले. प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश महामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्याशी झालेल्या चर्चेतुन कन्हान नगरपरिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाची भुमिका निश्चित करण्यात आली होती. या बाबतची अधिकृत सुचना वारंवार संबंधित पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती परंतु पक्षादेश झुंगारून पक्षाच्या अधिकृत भुमिकेशी विसंगत वर्तणुक केली आहे. अशा प्रकारचा ठपका ठेवुन भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री अरविंद गजभिये यांनी एका आदेशान्वये श्री शंकरराव चहांदे यांना पक्षातुन ६ वर्षाकरिता निलंबित केले आहे. तर नगरपरिषद भाजप गटनेता राजेंद्र  शेंदरे व भाजपा पारशिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावुन सात दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

       शंकरराव चहांदे हे १९९२ पासुन भाजप मध्ये कार्यरत आहे. या भागात पक्ष विस्ताराचे काम मोठ्या जोमाने केले आहे. नागपुर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती व कन्हान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदही भुषविले आहे. पक्षातुन निलंबित केल्यानंतर शंकर चहांदे पुढे कोणती भुमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान पोलीस स्टेशन येथे महाशिवरात्रि निमित्य बैठकीचे आयोजन : जुनी कामठी कामठेश्वर शिवमंदीर यात्रा झाली रद्द

Thu Mar 4 , 2021
*कन्हान पोलीस स्टेशन येथे महाशिवरात्रि निमित्य बैठकीचे आयोजन* *कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे जुनी कामठी कामठेश्वर शिवमंदीर यात्रा झाली रद्द* कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन येथे महाशिवरात्रि निमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन परिसरात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे कामेश्वर शिवमंदीर यात्रा रद्द करण्यात आली आहे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta