विदर्भ विभागीय कुस्ती स्पर्धेत तन्मय चरडे प्रथम

विदर्भ विभागीय कुस्ती स्पर्धेत तन्मय चरडे प्रथम

कन्हान,ता.२० डिसेंबर

  क्रीडा व सांस्कृतिक संचालना लय, महाराष्ट्र राज्या व्दारे आयोजित विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा, वर्धा जिल्हयातील देवळी येथे संपन्न झाली. यात धर्मराज विद्यालयाच्या विद्यार्थी खेडाळु तन्मय चरडे यांने प्रथम क्रमांक पटकावित राज्य स्पर्धेत प्रवेश निश्चित केल्याने तन्मय चरडे चे अभिनंदन करून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

     विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा वर्धा जिल्हयातील देवळी येथे मंगळवार (दि.२०) डिसेंबर २०२२ ला संपन्न झाल्या. यात धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान चा विद्यार्थी खेडाळु तन्मय चरडे याने १४ वर्ष वयोगटातील कुस्ती मध्ये स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित विदर्भातुन अव्वल, प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सदर यश संपादन करतांना तन्मय ने भंडारा, वर्धा, गडचिरो ली या जिल्हयातुन आलेल्या शालेय विद्यार्थी खेडाळु मल्लांना आपल्या डाव पेचाने व चपळाईने चारी मुंड्या चित केले. या सोबतच त्याची महाराष्ट्र राज्य स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. या यशासाठी क्रीडा शिक्षक श्री.हरिश केवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. धर्मराज विद्यालय यातील माध्यमिक चे मुख्याध्यापक श्री.रमेश साखरकर, प्राथमिक चे मुख्याध्यापक खिमेश बढिये, उपमुख्यध्यपिका, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक वृंदा नी तन्मय चरडे व प्रशिक्षक श्री.हरीश केवटे सर यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पारशिवणी तालुक्यात २१ पैकीं ११ ग्रामपंचायत काॅंग्रेस विजय भाजप ५ काँग्रेस ११ अपक्ष २ शिंदेभा गट २ 

Wed Dec 21 , 2022
पारशिवणी तालुक्यात २१ पैकीं ११ ग्रामपंचायत काॅंग्रेस विजय भाजप ५ काँग्रेस ११ अपक्ष २ शिंदेभा गट २ कन्हान,ता.२१ डिसेंबर     पारशिवणी तालुक्यातील २१ पैकीं ११ ग्रामपंचायती वर काॅंग्रेस ने विजयाचा दावा केला आहे. रविवार (दि.१८) डिसेंबर रोजी पारशिवणी तालुक्यात ७७ मतदान केंद्रा वर ७३.८६ टक्के निवडणुक पोलीसांच्या चोख बंदोबस्तात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta