फुटपाथ दुकानदारांना, साप्ताहिक व गुजरी बाजरास सुरक्षित जागा देण्यात यावी : कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांचे मुख्या धिका-याना निवेदना मागणी

फुटपाथ दुकानदारांना, साप्ताहिक व गुजरी बाजरास सुरक्षित जागा देण्यात यावी.

#) कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांचे मुख्या धिका-याना निवेदना मागणी.

कन्हान : – शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी मंच अध्यक्ष ॠृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नगरपरि षद मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करून निवेदन देऊन तात्का ळ फुटपाथ दुकानदारांना, साप्ताहिक व गुजरी बाजरा ला सुरक्षित जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्राम पंचायत चे रूपांतर नगरपरिषदेत होऊन आठ वर्ष झाली असुन सुद्धा नगरपरिषद प्रशा सनाने फुटपाथ दुकानदारांना, साप्ताहीक बाजाराला आणि गुजरी भाजीपाला दुकानदारांना सुरक्षित जागा न दिल्याने आज ही फुटपाथवर दुकाने, साप्ताहिक बाजार आणि गुजरी बाजर नागपुर- जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर लागत असल्याने अपघाताचे व अतिक्रम णचे प्रमाण वाढले असुन शहरात मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने शहरातील तारसा चौक ते आंबेडकर चौक पर्यंत नागपुर-जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग च्या दोन्ही बाजुला फुटपाथावर दिवसे दिवस अतिक्रमण वाढुन गुजरी भाजीपाल्याची दुकाने, फळाचे, गुपचुपचे हात ठेले आणि विविध प्रकारची दुकाने आणि वाहने महा मर्गा वरच लागत असून पार्किंग ची जागा नसल्याने स्टेट बैंक येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना महामा र्गावर वाहन उभी करावी लागत असल्याने चारपदरी महामार्ग ऐकेरी होऊन वाहन चालकांना भयंकर त्रास सहन करावा लागत असुन दररोज छोटे मोठे अपघात होऊन निदोर्ष नागरिक वेळे प्रसंगी जख्मी व अपंगत्व आणि मृत्युस बळी पडावे लागत आहे. मागील दोन महिन्यापुर्वी एप्रिल महिन्यात पाच तारखेला अशोक खंडेलवाल यांच्या महामार्गा वरील स्टेट बैंक समोर अपघातात मृत्यु झाला. या जुन महिण्यात १४ ला मुशरिफ अंसारी याचा स्ट्रेट बैंक समोर अपघात झाला असुन त्याचा उपचार कामठी येथील खाजगी रुग्णाल यात सुरू आहे. तसेच दर शुक्रवार ला भरत असलेला साप्ताहिक बाजार हा राष्ट्रीय महामार्गवर भरत अस ल्याने वाहन चालकांना चांगलीच तारेवरची कसरत लागत असुन रोजचा गुजरी बाजार हा तारसा चौक ते स्ट्रेंट बँक पर्यंत आणि आंबेडकर चौक येथुन पिपरी कडे जाणाच्या महामार्गावर लागत असल्याने दररोज छोटे-मोठे अपघात होत असुन सुद्धा नगरपरिषद प्रशा सन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावन कर यांच्या नेतृत्वात नगरपरिषद मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ फुटपाथ दुकानदारांना, साप्ताहिक बाजाराला आणि गुजरी बाजाराला सुरक्षि त जागा उपलब्ध करून शहरातील महामार्गावर होत असलेले अपघाताच्या प्रमाण कमी करून वाहतुक सुरळित करून महामार्ग मोकळे करावे. अशी मागणी केली आहे. याप्रसंगी कहान शहर विकास मंच संस्था पक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव सुरज वरखडे, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रूंघे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, प्रविण हुड, वैभव थोरात, हरीओम प्रकाश नारायण सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

योगेश रंगारी यांची नागपुर खंडापीठाच्या आदेशाने नगरपरिषद उपाध्यक्ष पदी नियुक्ती

Sun Jun 26 , 2022
योगेश रंगारी यांची नागपुर खंडापीठाच्या आदेशाने नगरपरिषद उपाध्यक्ष पदी नियुक्ती काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी विजय मिरवणुक काढुन जल्लोष साजरा  कन्हान : – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठा च्या आदेशानंतर माजी उपाध्यक्ष योगेश उर्फ ​​बाबु रंगारी यांची पुन्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याने काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुलदीप मंगल कार्यालय ते कन्हान नगरपरिषद पर्यंत […]

You May Like

Archives

Categories

Meta