निराधार लाभार्थ्यांना निधीचे वाटप करा ; युवासेनेचे तहसीलदारांना निवेदन

निराधार लाभार्थ्यांना निधीचे वाटप करा
युवासेनेचे तहसीलदारांना निवेदन
कन्हान:-
संजय गांधी निराधार योजनेसह निराधारांचे विविध शासकीय निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करा, अशा आशयाची मागणी युवा सेनेचेच्या वतीने रामटेक विधानसभेचे सचिव लोकेश बावनकर यांच्या नेतृत्वात पारशिवनी तहसीलदार प्रवीण सांगोडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

संजय गांधी निराधार योजना, अपंग व अनाथ यासह विविध शासकीय योजनेंतर्गत मिळणारा निधी मागील काही महिन्यांपासून लाभार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाने पुन्हा तोड वर काढल्याने निराधारांना या काळात आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वेळेत निधी मिळणे आवश्यक आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी विमला आर. यांनाही पाठविण्यात आल्याचे युवासेनेचे रामटेक विधानसभा सचिव लोकेश बावनकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हानच्या विकास कार्यवर भर देणार *भाजपा ओबीसी आघाडीचे महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या वतीने सत्कार

Sun Jan 9 , 2022
* कन्हानच्या विकास कार्यवर भर देणार *भाजपा ओबीसी आघाडीचे महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या वतीने सत्कार कन्हान ता.10 काही वर्षांपूर्वी कन्हान शहरात विविध प्रकारातील उद्योग कार्यरत होते. तेव्हा शहरात सोन्याचा धूर निघत होता. आज येथील अवस्था डबघाईस आली आहे. या शहराला पुन्हा एकदा गतकाळातील वैभव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, […]

You May Like

Archives

Categories

Meta